ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दणका; बार कौन्सिलने 2 वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 02:14 PM2023-03-28T14:14:13+5:302023-03-28T14:39:52+5:30

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात अॅड. सुशील मंचेकर यांनी तक्रार केली होती. जाणून घ्या प्रकरण...

Adv. Gunaratna Sadavarte hit by High Court; Cancellation of Advocate's Charter for 2 years | ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दणका; बार कौन्सिलने 2 वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दणका; बार कौन्सिलने 2 वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद

googlenewsNext

मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना मोठा धक्का मिळाला आहे. महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. दरम्यान, यापूर्वीच बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तुम्ही वकील आहात म्हणून तुम्हाला विशेष वागणूक मिळणार नाही. तसेच, बार कौन्सिलविरुद्ध काहीही बोलायला मुभा देणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना सुनावलं होतं. 

पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ॲड. सुशील मंचेकर यांनी याबाबत महाराष्ट्र बार काउंन्सिलकडे तक्रार केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. यानंतर ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा करत सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पेशाने वकील असताना गुणरत्न सदावर्ते वकिलांच्या आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करतात. मीडियासमोर, वादविवाद कार्यक्रमात, सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनादरम्यान ते वकिलाचा बँड परिधान करुन जातात, असं ॲड. सुशील मंचेकर यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर 7 फेब्रुवारीला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने सदावर्ते यांना नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. 

Web Title: Adv. Gunaratna Sadavarte hit by High Court; Cancellation of Advocate's Charter for 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.