अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 01:10 PM2021-04-05T13:10:22+5:302021-04-05T13:12:16+5:30

Param Bir Singh: या प्रकरणी याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

adv jayashree patil react high court decision in parambir singh letter and anil deshmukh case | अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही: जयश्री पाटील

Next
ठळक मुद्देयाचिकाकर्त्या जयश्री पाटील यांची प्रतिक्रियाअनिल देशमुख यांच्यावर पाटील यांची गंभीर टीकाकायद्यापेक्षा मोठे कुणीही नाही - पाटील

मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबईउच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे सीबीआयला आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सदर आदेश दिले आहेत. यानंतर, अनिल देशमुख ही मोघलाई नाही. कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया जयश्री पाटली यांनी दिली आहे. (jayashree patil react high court decision in anil deshmukh case)

मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआय विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर पत्रकारांशी बोलताना जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. 

अनिल देशमुख ही मोघलाई नाही

आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. १५ दिवसांत अहवाल द्यायचा आहे. अनिल देशमुख ही चौकशी योग्य प्रकारे करू शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे. यामध्ये मलाही बोलावण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही, असे जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. 

Param Bir Singh: “उच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा”

कायद्यापेक्षा मोठे कुणीही नाही

इकडे तुमचे राज्य नसून संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. फक्त माझीच याचिका उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी घेतली. न्यायायाने माझे खूप कौतुक केले. कोणीतरी एक शूर आहे, जे एवढ्या मोठ्या १०० कोटींच्या प्रकरणात समोर आले, असे न्यायालयाने म्हटल्याची माहिती माहिती जयश्री पाटील यांनी दिली.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित व्यासपीठासमोर मांडाव्यात, असे स्पष्ट केले. 
 

Web Title: adv jayashree patil react high court decision in parambir singh letter and anil deshmukh case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.