लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोपर्डी अत्याचार व खून खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांची साक्ष घेण्याची बचाव पक्षाची मागणी सोमवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळली़ या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे बचाव पक्षाच्या वकील अॅड़ विजयालक्ष्मी खोपडे यांनी सांगितले़ जिल्हा न्यायालयात कोपर्डी खटला अंतिम टप्प्यात आहे़ मागील सुनावणीला या खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड़ बाळासाहेब खोपडे व अॅड़ विजयालक्ष्मी खोपडे यांनी सहा जणांचा साक्षीदार म्हणून समावेशाची परवानगी द्यावी असा अर्ज केला. न्यायालयाने हा अर्ज नाकारला़ २४ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.
अॅड. निकम यांची साक्ष घेण्याची मागणी फेटाळली
By admin | Published: July 11, 2017 4:45 AM