शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

चाकरमानी निघाले बाप्पाच्या भेटीला, ‘अ‍ॅडव्हान्स’ बुकिंग फुल्ल : गणपती विशेष २,0४७ एसटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 5:19 AM

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºयांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे गर्दी नियंत्रणासाठी आणि उत्सव काळात प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रवाशांचा ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’कडे कल आहे. उत्सव काळासाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा एसटीची व्यवस्था केली आहे. यापैकी २ हजार ४७ एसटी बस अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये फुल्ल झाल्या आहेत.

- महेश चेमटे मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे गर्दी नियंत्रणासाठी आणि उत्सव काळात प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रवाशांचा ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’कडे कल आहे. उत्सव काळासाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा एसटीची व्यवस्था केली आहे. यापैकी २ हजार ४७ एसटी बस अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये फुल्ल झाल्या आहेत. कोकण मार्गासह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या १०० गणपती विशेष एसटी फुल्ल झाल्या आहेत.गणपती विशेष एसटी वाहतुकीचा टप्पा २० आॅगस्टपासून सुरू झाला आहे. हा टप्पा २४ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या पाच दिवसांपैकी २३ आॅगस्टला सर्वाधिक बस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. २२ आॅगस्ट रोजी एसटीच्या ३५८ बस, २३ आॅगस्ट रोजी १ हजार ३८१ बस आणि २४ आॅगस्ट रोजी २७३ बस सोडण्यात येणार आहेत. टोल नाक्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी उत्सव काळात २२, २३ आणि २४ आॅगस्ट रोजी एसटीला टोलमुक्ती देण्यात आली आहे.तसेच गणपतीसाठी पश्चिम महाराष्ट्रातही एसटीने १०० जादा एसटी चालविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर या मार्गावर जादा एसटी धावणार आहेत. या जादा एसटीचेदेखील आगाऊ आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एसटी महामंडळातून देण्यात आली.जादा एसटीचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग २२ जुलैपासून सुरू करण्यात आले, तर ग्रुप बुकिंग १५ जुलै रोजी सुरू झाले होते. परतीच्या प्रवासाचे बुकिंग २३ जुलैपासून सुरू करण्यात आले.सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील १५० एसटी फुल्लकोकणात विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी होते. परिणामी, गर्दी नियंत्रणासाठी आगार नियंत्रकाला जादा एसटी सोडण्याचा अधिकार आहे. या धर्तीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी स्थानकातून प्रत्येकी १५० एसटीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या एसटीदेखील अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये फुल्ल झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली.२२ ते २४ आॅगस्टदरम्यानएसटी फुल्ल...तर आणखी बस सोडणारगणेशोत्सव आणि कोकण यांचे नाते अतूट आहे. गणेशोत्सवासाठी सर्व प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा एसटीची व्यवस्था केली आहे. गरज पडली तर कोकण मार्गावर आणखी एसटी सोडण्यात येतील. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांशी प्रवासी खासगी बसला प्राधान्य देतात. यामुळे या मार्गावर कोकणाच्या तुलनेत कमी एसटी उपलब्ध केल्या आहेत.- दिवाकर रावते, परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्षमध्य रेल्वेच्या आणखी ८ विशेष फेऱ्यागणेशोत्सव काळातील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेकडून आणखी ८ विशेष फेºया चालवल्या जाणार आहेत. सद्य:स्थितीतील बहुतांशी ट्रेनचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे मुंबई-चिपळूण, पुणे -सावंतवाडी मार्गावर या फेºया चालवण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.ट्रेन क्रमांक (०११०१ ) मुंबई-चिपळूण-मुंबई या मार्गावर चार फेºया चालवण्यात येणार आहेत. २१ आॅगस्ट ते २५ आॅगस्ट या कालावधीत या ट्रेन सोडण्यात येणार आहेत. २१ आॅगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटणार असून चिपळूणला त्याच दिवशी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे.दादर, ठाणे, पनवेल, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे, दिवाणखवटी, खेड आणि अंजनी या स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेनचा परतीचा प्रवास (०११०२) चिपळूण येथून २१ आॅगस्टला सायंकाळी ५.४५ वाजता सुरू होणार आहे. त्याच दिवशी रात्री ११.४० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.मनमाड-करमळी वन वे विशेष (एक फेरी)ट्रेन क्रमांक (०१२७१) मनमाड येथून २२ आॅगस्ट रोजी दुपारी ४.१५ वाजता सुटणार असून करमळी येथे दुसºया दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचणार आहे. ही ट्रेन नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबणार आहे.करमळी-अजनी वन वे विशेष (एक फेरी)ट्रेन क्रमांक (०१२७२) करमळी येथून २३ आॅगस्टला दुपारी १ वाजता सुटणार असून अजनी येथे दुसºया दिवशी दुपारी २.१५ वाजता पोहोचणार आहे. ही ट्रेन सावंतवाडी रोड, कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, वर्धा या स्थानकांवर थांबणार आहे.पुणे-सावंतवाडी रोड-पुणे (२ फे ऱ्या)ट्रेन क्रमांक (०१४६१) पुणे येथून २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता सुटणार असून सावंतवाडी रोड येथे दुसºया दिवशी सकाळी ८ वाजता पोहोचणार आहे.ट्रेन क्रमांक (०१४६२) सावंतवाडी रोड येथून २३ आॅगस्टला दुपारी २.०५ वाजता सुटणार असून पुणे स्थानकावर मध्यरात्री ३.५५ वाजता पोहोचणार आहे.च्थांबे : लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव