शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

महा ई- सेवा केंद्रातून मिळणार एसटीचे आगाऊ आरक्षण

By admin | Published: October 18, 2016 6:20 PM

ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचे आगाऊ आरक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी महा- ई सेवा केंद्रातून विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

- हर्षनंदन वाघ/ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 18 -  ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटीचे आगाऊ आरक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी महा- ई सेवा केंद्रातून विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचा लाभ राज्यातील जवळपास २० हजार ग्रामपंचायत क्षेत्रातीलजनतेला होणार आहे.देशातील सर्वात मोठा सण म्हणून ओळख असलेल्या दिवाळी सणाची चाहुल सर्वांना लागली आहे. अनेक कुटूंबीयांनी दिवाळी कशी साजरी करायची, याबाबत आराखडा तयार केला आहे. तर काहींनी दुरच्या नातेवाईकांकडे दिवाळी साजरी करण्याचेठरविले आहे. यासाठी वेळेवर एसटीचे तिकिट मिळत नसल्यामुळे अनेकांची नाराजी होते. यासाठी एस.टी.महामंडळाने इंद्रधनू आरक्षण प्रणाली अंतर्गत महा ई सेवा केंद्रातून एसटी तिकिटाच्या आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध केली आहे.इंद्रधनु आरक्षण प्रणालीमुळे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर निपाणी, बेळगाव, कारवार, गोवा सारख्या महाराष्ट्राच्या सीमाभागातील प्रवाशांबरोबरच गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील प्रवाशांना एसटीचे आगाऊ तिकीट आरक्षीत करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात सध्या कार्यरत मे.महा आॅनलाईन लि. कंपनीच्या ५हजार ८०० ई सेवा केंद्रातून प्रवाशांना आगाऊ आरक्षण तिकीट काढता येणार आहे. संकेतस्थळावरही तिकीट आरक्षण..त्याचप्रमाणे प्रवाशांना एसटी महामंडळाच्या संकेतस्थळाबरोबरच शासकीय संकेतस्थळावरुनही तिकिट आरक्षीत करता येईल. यासह प्रवाशाच्या इच्छित प्रवाशाचा मार्ग, एसटी बसेसच्या वेगवेगळ्या श्रेणीचे भाडेही जाणून घेता येणार आहे.