अकोला, दि. १५- बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्राने सुरू केलेली मुद्रा योजना बँकांसाठी अनास्थेचा विषय असला, तरी जिल्हय़ातील एका गावात तब्बल १८३ लाभार्थ्यांना कर्ज वाटप केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद असून, त्याला प्रतिबंध घालण्याची मागणी लोकप्रतिनिधींनाच करावी लागली, हे विशेष. केंद्र शासनाने बेरोजगारांना व्यवसाय निर्मितीसाठी कर्ज देण्याची योजना ह्यमुद्राह्ण सुरू केली. कर्जाच्या वाढत्या रकमेनुसारही नामकरण केले. त्यामध्ये शिशू, किशोर व तरुण नावे दिल्या गेली. सुरुवातीला योजनेतून कर्ज वाटपाला बँकांची नकारघंटाच होतीच; मात्र बँकांवर वाढत्या दबावाने काही प्रकरणे मार्गी लागली. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दलालीही झाली. अकोला तालुक्यातील पळसो बढे या गावात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने मुद्रा योजनेचे तब्बल १८३ लाभार्थी विविध व्यवसायांसाठी पात्र ठरविले. त्यांना कर्ज वाटपही करण्यात आले. लगतच्या दहिगाव आणि पळसो येथील लोकसंख्या मिळून होत असलेली ही लाभार्थी संख्या डोळे विस्फारणारी आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना कर्ज झालेल्या कर्ज वाटपाबाबत लोकप्रतिनिधींनीच शंका घेत बँकेच्या रिजनल मॅनेजर यांना लक्ष घालण्याचे सांगितले. त्यामुळे वाढत चाललेले मुद्रा योजनेचे कर्ज वाटप त्या संख्येवरच थांबविण्यात आले आहे. 'तरुण' लाभार्थी अत्यल्पयोजनेत स्वयंरोजगारासाठी व्यवसायाच्या गरजेनुसार अर्थसाहय़ दिले जाते. त्यामध्ये २0 हजार ते ५0 हजार, ५0 हजार ते अडीच लाख, तेथून पुढे दहा लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यापैकी तिसर्या टप्प्यातील व्यवसायासाठी कर्ज घेणार्या लाभार्थ्यांची संख्या अत्यल्प आहे. केवळ शिशू योजनेतच लाभार्थ्यांना गुंडाळण्यात येत असल्याचे वाटपाच्या आकडेवारीतून दिसत आहे. प्रति लाभार्थी सरासरी २६ हजारांचे वाटपजिल्हय़ात मुद्रा योजनेचे लाभार्थी आणि कर्ज वाटपाची रक्कम पाहता प्रति लाभार्थी सरासरी २६९२३ रुपये वाटप झाल्याचे दिसत आहे. त्यातून या लाभार्थ्यांना केवळ शिशू योजनेतच गुंडाळल्याचीही माहिती आहे. किशोर आणि तरुण योजनेसाठी अत्यल्प लाभार्थी असल्याचीही माहिती आहे.
एकाच गावात ‘मुद्रा’चा लाभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 2:40 AM