शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

पंतप्रधानांचा फोटो वापरून जाहिरात

By admin | Published: April 28, 2016 3:30 AM

पंतप्रधान जनआवास योजना देशात राबविली जात असून गोरगरीब जनतेसाठी काही लाखाची सबसिडी देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे.

कर्जत : पंतप्रधान जनआवास योजना देशात राबविली जात असून गोरगरीब जनतेसाठी काही लाखाची सबसिडी देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. असे असताना कर्जत तालुक्यात प्रकल्प असलेल्या एका बिल्डरने थेट पंतप्रधान मोदी यांचे फोटो असलेली जाहिरात करून जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र भाजपाने घेतली असून नेरळ पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्र ार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यातील मंत्री हाऊस येथे मुख्य कार्यालय असलेल्या एक्स्झर्बिया डेव्हलपर्सचे कर्जत तालुक्यात तीन बांधकाम प्रकल्प आहेत. त्यांनी गुढीपाडवा काळात घरे घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आणि कर्जत -कल्याण राज्यमार्ग तसेच कर्जत तालुक्यातील अन्य प्रमुख रस्त्यावर मोठे जाहिरात फलक जागोजागी लावले होते .त्या जाहिरात फलकावर ठळकपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो झळकत होते. रायगड जिल्हा भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष नितीन कांदळगावकर यांनी अशा प्रकारच्या जाहिरातीबाबत राज्य भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्याशी संपर्क साधून ही बाब सांगितली. भंडारी यांनी आपण कोणत्याही बिल्डरला पंतप्रधान अथवा राज्याचे मुख्यमंत्री यांचे फोटो लावण्याची परवानगी दिली नाही. तसेच तशी परवानगी पीएमओ कार्यालय देत असते, त्यामुळे बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कांदळगावकर यांनी नेरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्र ार दिली.(वार्ताहर )