काम नाही झाले तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका; अजित पवारांच्या कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 09:31 PM2024-08-05T21:31:12+5:302024-08-05T21:31:37+5:30

बारामती येथे आयोजित पवार यांनी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सज्जड इशारा दिला

Advice to Ajit Pawar workers, office bearers meeting in Baramati | काम नाही झाले तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका; अजित पवारांच्या कानपिचक्या

काम नाही झाले तरी चालेल, वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका; अजित पवारांच्या कानपिचक्या

बारामती -  निवडणुकीच्या निमित्ताने केवळ विकासाचे बोला. विरोधकांनी टीका केली तरी त्याला प्रत्युत्तर देवू नका. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. काहीजण उत्साही आहेत, काम करतात. चुकीच्या प्रकारामुळे मला ट्रोल करण्यात आले, राज्यात माझी बदनामी झाली. परंतु काय मनात आले, उत्साहाच्या भरात काहींनी मटके फोडले. काही म्हणाले, अजित पवार तीच वाट पाहतोय, माझा काय संबंध, ते तर मी टीव्हीतच पाहिले.आता मी सांगेन का, की मटके फोड म्हणून. एवढ सांगून कोणी असं कोणी केल, तर तिकडुन पाठविलेले पिल्लु सुपारी घेवून आल्याचे मी समजेन. काम नाही झाले तरी चालेल, पण कृपया वजाबाकी करण्याच्या भानगडीत पडू नका,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ते यांना कानपिचक्या दिल्या.

बारामती येथे आयोजित पवार यांनी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सज्जड इशारा दिला. चुकीच्या प्रकारामुळे मला ट्रोल करण्यात आले,राज्यात माझी बदनामी झाल्याचे पवार म्हणाले. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. गटातटाचे राजकारण करु नये. एकमेकांबाबत हलक्या कानाचे राहु नका. समोरच्या लोकांनी वेगळ्या पध्दतीने शब्द वापरल्यास मनाला लावून घेवू नका. बोलण्याने कोणाला भोक पडत नाहीत. अरे ला कारे म्हणू नका, ९ तारखेपासून आपण राज्याच्या दाैऱ्यावर जाणार आहोत. त्यामूळे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपली जबाबदारी घरचे काम समजून कर्तव्याच्या भावनेतून करा, देखील सुचना पवार यांनी केल्या.

राज्यातील माता भगिनींच्या सबलीकरणासाठी विविध योजना सरकारने आणल्या आहेत. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविवण्याचे काम पदाधिकार्यांनी करावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पैसे घेतात. गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील माता भगिनींच्या सबलीकरणासाठी विविध योजना सरकारने आणल्या आहेत. त्या पुर्ण करण्याची राज्य सरकारमध्ये धमक आहे. त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविवण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे, अशा सुचना पवार यांनी केल्या.

पवार म्हणाले,विधानसभा अस्तित्वात आल्यापासून राज्यात कोणत्याही आमदाराने आपल्याएवढी विकासकामे केली आहेत.माझा दावा आहे,त्यासाठी म्हणाल ती पैज लावु,काही हजार  कोटी बारामतीत  आणले.या गोष्टी झाकुन राहत नाहित.रस्ते चकाचक झाले,रेल्वेप्रकल्प मार्गी लागला.शहरातील महत्वाची कामे मार्गी लावली.त्यानंतर शहराचा पुर्ण कायापालट झाला.माता भगिनींनी आपण निवडुुन दिलेल्या लोकप्रतिनिधीने काय काम  केले ते वेळ काढुन अवश्य पहावे.मात्र, तुमचे काम न बोलता होत असल्याने त्याची किंमतच राहिली नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली.याबाबत माहिती देणारी पुस्तक लवकरच प्रसिध्द करणार असल्याचे पवार म्हणाले.

लोकसभेच्या वेळी काहीजण ‘लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा’ असं म्हणाले होते. पण कोणता दादा,असा प्रतिप्रश्न करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्कील टोला लगावला. पवार म्हणाले, कोणता दादा हे ठरविण्याचा अधिकार त्यांचा आहे. आपण त्यासाठी बळजबरी करु शकत नाही. त्यांचे केवळ मतपरीवर्तन करु शकतो, असे पवार म्हणाले. मागे मी धरणाचे बोललो. त्यानंतर आत्मक्लेष देखील केले. पण त्यानंतर काही अपशब्द वापरले नसल्याचे पवार यांनी नमूद केले.

मध्यंतरी काहीजणांनी काहींनी मला बहुरुपी केले. वेगळेच कपडे घालून दिल्लीला गेल्याचे सांगितले. पण मला लपुनछपुन जाण्याचे कारण नाही. मी नेहमी उजळ माथयाने वावरतो. आपले नाणे खणखणीत आहे. सीसीटीव्ही सर्वत्र असतात. त्याची शहानिशा करावी,असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
 

 

Web Title: Advice to Ajit Pawar workers, office bearers meeting in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.