शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

खंडपीठासाठी वकील रस्त्यावर !

By admin | Published: December 13, 2014 12:44 AM

न्यायालयीन कामकाजावर परिणाम : महालोक अदालतवरही बहिष्कार

कोल्हापूर : उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील आज, शुक्रवारी काम बंद ठेवून रस्त्यावर उतरले. यामुळे न्यायालयीन कामकाज ठप्प झाले. कोल्हापुरातील टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाजवळ वकिलांनी दिवसभर लालफिती लावून ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला शहरातील विविध पक्ष, संघटना व राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून हे वकील उद्या, शनिवारी महालोक अदालतीवरही बहिष्कार घालणार आहेत. दरम्यान, जिल्हा पक्षकार महासंघानेही केंद्रीय महालोक अदालतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहेउच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील वकील गेल्या २५ ते ३० वर्षांपासून लढा देत आहेत. सहा जिल्ह्यांतील सुमारे १७ हजार वकिलांनी गेल्या वर्षी ५८ दिवस आंदोलन केल्यानंतर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्याची शिफारस राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्याकडे केली होती.न्यायमूर्ती शहा यांनी कोल्हापूर भेटीत जानेवारी २०१४ पर्यंत सर्किट बेंच स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ते स्थापन झालेले नाही. यामुळे सर्किट बेंचसाठी वकिलांनी आजपासून नव्याने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज काम बंद आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात आज, गुरुवारी सकाळी ज्येष्ठ वकील के. ए. कापसे यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी अ‍ॅड. डी. बी. भोसले, अ‍ॅड. पी. आर. पाटील, अ‍ॅड. डी. डी. घाटगे, अ‍ॅड. माणिक मुळीक, अ‍ॅड. पी. आर. वाघवलीकर, अ‍ॅड. एस. बी. पाटील, अ‍ॅड. ए. डी. भूमकर, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, आदींनी आपल्या भाषणात कोणत्याही स्थितीत कोल्हापूरला खंडपीठ झालेच पाहिजे, अशी मागणी करून त्यामागची कारणे विषद केली.त्यानंतर दुपारी वकिलांनी कावळा नाका येथून शहरात खंडपीठ प्रश्नासाठी रॅली काढली. ही रॅली व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी चौक व महापालिकामार्गे सीपीआर रुग्णालयाजवळ आली. सायंकाळीही हे आंदोलन सुरू होते. वकील आंदोलनात असल्यामुळे न्यायालयातील कामकाजावर परिणाम जाणवला. जोपर्यंत शासन खंडपीठाबाबत निर्णय घेणार नाही, तोपर्यंत लाल फिती लावून काम करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला आहे. या आंदोलनाला शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, जिल्हा पक्षकार महासंघाचे निमंत्रक पद्माकर कापसे, प्रसाद जाधव, सुरेश गायकवाड यांच्यासह पक्षकारांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी संजय मंडलिक यांनी याप्रश्नी जिल्ह्यातील सहा आमदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत भेट घेऊ, असे आश्वासन दिले. आंदोलनात खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, वकील यांनी भाग घेतला होता.आजचे आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले. जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व न्यायालयांमधील सुमारे साडेतीन हजार खटल्यांच्या सुनावणीचे कामकाज झाले नाही.- अ‍ॅड. विवेक घाटगे, निमंत्रक, खंडपीठ कृती समिती, कोल्हापूर.गौडा यांच्याबरोबर मंगळवारी बैठककोल्हापूर खंडपीठप्रश्नी मंगळवारी (दि. १६ ) केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांच्याबरोबर खासदार धनंजय महाडिक व खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकीला (दि. १४) रविवारी कोल्हापुरातून निमंत्रक व जिल्हा वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. सचिव राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, आदी जाणार आहेत.