कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीच्या निमंत्रकांसह सहा वकिलांची मंगळवारी (दि. १६) केंद्रीय कायदा मंत्री सदानंद गौडा यांच्याबरोबर दिल्ली येथे सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. खंडपीठासाठी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आज, रविवारी कोल्हापुरातून खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाटगे यांच्यासह सहा वकील रवाना झाले.गतवर्षी या मागणीसाठी वकिलांनी ५५ दिवस आंदोलन करून तत्कालीन काँग्रेस आघाडीला जागे केले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथम सर्किट बेंचची मागणी करा, असे सांगून याला मान्यता दिली. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी न्यायाधीश वझीफदार यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. ३१ जानेवारी २०१४ अखेर यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन शहा यांनी वकिलांना दिले, पण ११ महिने उलटून गेले तरी यावर निर्णय झालेला नाही. समितीने शहांना अहवाल दिला असल्याचे समजते. पण, अद्याप खंडपीठाबाबत निर्णय झालेला नाही. (प्रतिनिधी)मोदी, गौडांना राजू शेट्टी भेटणार काल, शनिवारी खासदार राजू शेट्टी यांनी टाऊन हॉल येथील वकिलांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. शेट्टी यांनी, कोल्हापूर खंडपीठ प्रश्नासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांची लवकरच भेट घेणार आहोत, असे आश्वासन जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांना दिले.
खंडपीठासाठी वकिलांची उद्या दिल्लीला धडक
By admin | Published: December 14, 2014 10:30 PM