मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आॅटोरिक्षा व टॅक्सीमधे जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.मागील काही दिवसांत आॅटोरिक्षा व टॅक्सीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषत: ठाणे शहरात आॅटोरिक्षा चालकांनी मुलींवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.ठाण्याच्या नौपाडा पोलीस स्टेशनमधील घटनेनंतर पोलीस वप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तपासणी मोहीम राबवून ७२१२ आॅटोरिक्षा तपासण्यात आल्या.१०४ आॅटोरिक्षांचा परवाना निलंबित केला असून, १०८ रिक्षाचालकांचेलायसन्स निलंबित केले आहे. सन २०१६-१७मध्ये ठाण्यात १७ हजार वाहने दोषी आढळली. त्यात ३५३ जणांचे परवाने रद्द केले आहेत. ५५५ लोकांकडे परवाने नसल्याचे आढळले. ३ कोटी ४७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पाटील यांनीदिली. या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य किसन कथोरे, संग्राम थोपटे, संजय केळकर यांनी भाग घेतला.
आॅटोरिक्षा, टॅक्सीतही जीपीएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 4:49 AM