निनाद देशमुख बंगळुरू- बंगळुरू येथे हवाई दलातर्फे आयोजित 'एअरो इंडिया' प्रदर्शनाला गालबोट लागले. प्रकाशनात सूर्यकिरण एअरो ब्याटिक टीम हवाई कसरती सादर करणार होत्या. यासाठी एहलंका विमानतळावर मंगळवारी प्रात्यक्षिके सुरू होती. यावेळी 'मिड एआरो स्पिन मनुव्हर' करताना दोन्ही विमाने एकमेकांना धडकल्याने ती कोसळली. दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी प्रसंगावधान राखत प्याराशूट च्या साह्याने विमानातून बाहेर पडत ते जमिनीवर उतरले. मात्र एका वैमानिकाचा मृत्यू आणि दोन वैमानिक जखमी झाल्याचे डीजीपी फायर फोर्सेस एम. एन. रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. हवाई दलातर्फे दर दोन वर्षानंतर 'एअरो इंडिया' प्रदशनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बंगळुरू येथील हवाई दलाच्या एलहंका विमानतळावर हे प्रदर्शन 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान या प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनात देश विदेशातील अनेक देशांची विमाने तसेच हवाई दलाचे अधिकारी आणि अनेक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या प्रदर्शनात भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एआरो ब्याटिक टीम ही हवाई कसरती सादर करणार होती. त्याची तयारी विमानतळावर सुरू होती. या दलाने हवेत उड्डाण घेतल्यावर कसरती करण्यास सुरवात केली. यावेळीमिड एआरो स्पिन मनुव्हर' कसरत करन्यासाठी दोन्ही विमाने जवळ आली यावेळी ती एकमेकांना धडकल्याने ती खाली कोसळू लागली. यावेळी प्रसंगावधान राखत वैमानिकाने प्याराशूट च्या साह्याने विमानाबाहेर उड्या मारल्या. यात एका वैमानिकाचा मृत्य झाला तर दोन वैमानिक जखमी झाले आहे. घटनास्थळी बचाव पथक पोहोचले असुन बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. जखमी वैमानिकाना उपचारासाठी हवाई दलाच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती एम. एन. रेड्डी यांनी दिली आहे.
बंगळुरु येथे हवाई दलाच्या ‘एअरो इंडिया’ प्रदर्शनाला गालबोट ,विमान अपघातात एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 1:26 PM
एहलंका विमानतळावर मंगळवारी प्रात्यक्षिके सुरू होती. 'मिड एआरो स्पिन मनुव्हर' करताना दोन्ही विमाने एकमेकांना धडकल्याने ती कोसळली.
ठळक मुद्देहवाई दलातर्फे दर दोन वर्षानंतर 'एअरो इंडिया' प्रदशनाचे आयोजन