पुणे : कनिष्ठ महाविद्यालयांची २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता प्रचलित निकषानुसार आॅफलाइन पद्धतीने करण्याचा शासनाने आदेश काढला आहे. त्यामुळे आता संचमान्यतेबाबतचा संभ्रम संपुष्टात आला असून, शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.मंगळवारी अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांनी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन संचमान्यता होण्यास अधिक वेळ लागत आहे ही शक्यता गृहीत धरून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये संचमान्यतेच्या प्रचलित निकषानुसार आॅफलाईन संचमान्यता करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे परिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यानुसार माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनीही परिपत्रकाद्वारे आॅफलाईन संचमान्यता होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे अध्यक्ष प्रा. संतोष फासगे म्हणाले, ‘‘शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस राज्य शासनाने संचमान्यता आॅफलाईन करण्याचा निर्णय घेतला, ही चांगली बाब आहे. या आदेशामुळे अर्धवेळ व तासिक तत्त्वावर असणाऱ्या शिक्षकांना वेतन देता येऊ शकेल. तसेच, संचमान्यता आॅफलाईन होत आहे.(प्रतिनिधी)
आॅफलाइन संचाला मान्यता
By admin | Published: April 28, 2016 2:09 AM