शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

२८ तासांनंतर तारापूरचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू

By admin | Published: May 21, 2016 4:02 AM

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुमारे ४० जणांनी अहोरात्र करून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पूर्ण केले. तर, पाणीपुरवठा २८ तासांनंतर दुपारी दीड वाजता सुरळीत झाला.

बोईसर : तारापूर एमआयडीसीसह परिसरातील २० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या ३६ इंच व्यासाच्या लोखंडी पत्र्याच्या जलवाहिनीवर गुरुवारी सकाळी कंटेनरवरील अवजड कॉइल वाघोळ खिंडीत कोसळून फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुमारे ४० जणांनी अहोरात्र करून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता पूर्ण केले. तर, पाणीपुरवठा २८ तासांनंतर दुपारी दीड वाजता सुरळीत झाला. कंटेनरवरून सुमारे २० टनांची पत्र्याची कॉइल २० फूट खाली पाइपलाइनवर कोसळल्याने पाइप दोन ते तीन ठिकाणी फुटला होता. या दुरुस्ती कामाकरिता तीन क्रेन, एक जनरेटर सेट, चार वेल्डिंग मशीन, १२ वेल्डर्स, काही फिटर्स तसेच एमआयडीसीचे अभियंते व अधिकारी आणि मदतनीस अशा सुमारे ४० जणांच्या टीमने गुरुवारी साडेअकरा वाजता सुरू केले, ते आज सकाळी साडेनऊ वाजता संपले. अवजड कॉइलमुळे फाटलेला पाइप पूर्ण कापून काढून त्या जागी आठ एमएम जाडीचा व १२ मीटर लांब आणि १००० एमएम व्यासाचा पाइप नव्याने टाकण्यात आला. उन्हाचा पारा वाढल्याने वेल्डर्सना चक्कर आली होती. मात्र, एमआयडीसीमधील काही कारखान्यांतून वेल्डर्स मागवून काम पूर्ण करण्यात आले. वाघोबा खिंडीच्या उतार भागात हे काम सुरू असताना अहोरात्र भरधाव धावणाऱ्या वाहनांपासूनही काम करणाऱ्यांना धोका उद्भवत होता. य ासर्वांवर मात करून ठप्प झालेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास एमआयडीसीचे अभियंता नंदकुमार करवा आणि आर.पी. पाटील व त्यांच्या टीमला यश आले. (वार्ताहर)युद्धपातळीवर काम केल्याने दोन ते अडीच दिवसांचे काम २५ तासांत पूर्ण केले असून या अपघातामुळे एमआयडीसीचे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई एमआयडीसी सदर ट्रान्सपोर्टवाल्यांकडून वसूल करणार आहे.- नंदकुमार करावा, उपअभियंता, एमआयडीसी तारापूर.