'बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात, पण जरा उशीर केलात'; अजित पवारांना उद्देशून अमित शाह यांचे जाहीर वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:22 AM2023-08-07T06:22:45+5:302023-08-07T06:23:29+5:30

सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते.

'after a long time you sat in the right place, but a little late'; Amit Shah's public statement addressed to Ajit Pawar ncp | 'बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात, पण जरा उशीर केलात'; अजित पवारांना उद्देशून अमित शाह यांचे जाहीर वक्तव्य

'बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात, पण जरा उशीर केलात'; अजित पवारांना उद्देशून अमित शाह यांचे जाहीर वक्तव्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  
पिंपरी (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक गट भाजपबरोबर गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चिंचवड येथे पहिला जाहीर कार्यक्रम झाला. त्याचा उल्लेख करीत शाह म्हणाले, ‘खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. तुमच्यासाठी हीच जागा योग्य होती, पण तुम्ही उशीर केलात,’ त्यावर पवार यांनी थेट हात जोडून दाद दिली.

सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील होते. 

शाह यांनी सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री झाल्याबाबत पवार यांना शुभेच्छा दिल्या. शाह म्हणाले, ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा पुण्यात आलो आहे. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसलो आहे. पवार यांना सांगू इच्छितो की खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. 

इथेनॉलनिर्मिती करा; पैसे केंद्र सरकार देईल
एकट्या महाराष्ट्रात ४२ टक्के सहकारी संस्था आहेत. एकीकडे देश, तर एकीकडे महाराष्ट्र असे चित्र आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटलायझेशन केले आहे. रविवारी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घेतली. इथेनॉल बनविणार नाही, असा एकही साखर कारखाना महाराष्ट्रात असू नये, राज्यात सर्वच कारखान्यांनी इथेनॉलनिर्मिती प्रकल्प उभारावेत, त्यांना केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले. सहकारी साखर कारखान्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून तत्पर निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

इकडे कशासाठी आलो? पवारांनी सांगूनच टाकले
n उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर कशासाठी आलो आहे, हे सांगून टाकले. पवार म्हणाले, महाराष्ट्राचे भले फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहच करू शकतात. 
n केंद्रात सहकार विभाग निर्माण करण्यासाठी आम्ही बावीस वर्षे प्रयत्न करत होतो. कोणीही डेरिंग केलं नाही. डेरिंग फक्त अमित शाह यांनी करून दाखवले. म्हणूनच आज सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे.
n फक्त मोदी आणि शाह हे दोघेच देशाचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळे मी मोठा निर्णय घेतला आहे.

अमित शाहंकडून सहकारात मोठे बदल झाले आहेत. शाह यांना महाराष्ट्र खूप चांगला कळतो.
    - देवेंद्र फडणवीस, 
    उपमुख्यमंत्री 

Web Title: 'after a long time you sat in the right place, but a little late'; Amit Shah's public statement addressed to Ajit Pawar ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.