शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
2
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
3
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
4
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
5
Video: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
6
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
7
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
8
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
9
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
10
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
11
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
12
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
13
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
14
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
15
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
16
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
17
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
18
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
19
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
20
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

दीर्घ प्रतीक्षेनंतर धो धो बरसला! मराठवाड्याला झोडपले; ५ जण गेले वाहून; महाराष्ट्रासह १८ राज्यांना आज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 6:34 AM

Heavy Rain in Vidarbha & Marathwada: विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाने झोडपले. काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला.

 मुंबई -  विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू होती. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाने झोडपले. काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. नदी नाल्यांच्या पुरात वाहून गेल्याने दुर्घटनाही घडल्या आहेत.

विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. कळमनुरी ते शेंबाळपिंपरी (जि. हिंगोली) रस्ता बंद झाल्याने मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटला आहे.

आज मुसळधारेचा इशारा पुढील चार ते पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील १८ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.नांदेड : ६३ पैकी २६ मंडळात अतिवृष्टी. परभणी : २५ गावांचा संपर्क तुटला.यवतमाळ : १३ तालुक्यांना पावसाने झोडपले.वाशिम : मानोरा तालुक्यात बैलांसह छकडे वाहून गेले.वर्धा : चाणकी (कोरडे) येथे आजोबा आणि नात नाल्यात वाहून गेले.लातूर : ढोरसांगवी (ता. जळकोट) येथे ओढ्याच्या पुरात २० वर्षीय तरुण वाहून गेला.यवतमाळ : देऊरवाडी लाड (ता. दारव्हा) येथे बैलगाडीसह शेतकरी वाहून गेला.हिंगोली : टेंभुर्णी (ता. वसमत) येथे वाहून गेलेले शेतकरी सुभाष सवंडकर यांचा मृतदेह आढळला.

आंध्र-तेलंगणात मुसळधार, विविध दुर्घटनांत १० ठारहैदराबाद / नवी दिल्ली: देशात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून रविवारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मुसळधार पावसामुळे जनजीवन स्कळीत झाले. आंध्र प्रदेशात दरडी कोसळून ५ जण ठार झाले तर इतर घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला. हवामान खात्याने दक्षिणेतील राज्यांना आणखी पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तेलंगणात केसमुद्रम व महबूबाबाददरम्यान रेल्वे रूळ वाहून गेले. सोमवारी शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली आहे.■ उत्तराखंड, हिमाचलसह ५ राज्यांत पावसामुळे नद्यांना पूर तसेच भूस्खलनाचा इशारा. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतweatherहवामान