शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

अखेर मेडिकलची रक्तपेढी सुरू

By admin | Published: November 13, 2015 12:27 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ मधील त्रुटींवर बोट ठेवत परवानगी नाकारलेल्या अन्न व औषध प्रशासनाने अकरा दिवसानंतर मंगळवारी मंजुरी दिली.

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रक्तपेढीत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ मधील त्रुटींवर बोट ठेवत परवानगी नाकारलेल्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अकरा दिवसानंतर मंगळवारी मंजुरी दिली. एफडीएच्या या आडमुठेपणामुळे का होईना, मेडिकलला तडकाफडकी चार मशीन खरेदी करता आल्या आणि यामुळे रुग्णांना दर्जायुक्त रक्तघटक मिळण्याची सोय उपलब्ध झाली. मेडिकलच्या रक्तपेढीच्या तपासणीवेळी एफडीएच्या चमूला रक्तपेढीत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या. त्रुटी दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे आदेश २८ आॅक्टोबर रोजी दिले होते.त्यानंतर ३० आॅक्टोबर रोजी केवळ ‘होल ब्लड’चा पुरवठा करण्याची परवानगी दिली. मात्र, ‘एलायझा रिडर’मशीनमधील दोष, सेल्स काऊंट मशीन, कोअ‍ॅग्युलो मीटर आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या त्रुटी काढत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ला परवानगी नाकारली. या मशीन्स उपलब्ध झाल्यावरच परवानगी देणार अशी भूमिका औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी घेतली. यामुळे अडचणीत सापडलेल्या मेडिकल प्रशासनाने कधी नव्हे ते केवळ पाच दिवसांत सुमारे २५ लाखांच्या चार मशिनी खरेदी केल्या. मात्र मशीन स्थापनेत उशीर झाल्याने परवानगी मिळायला अकरा दिवस लागले. या दरम्यान मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या डेंग्यू, मलेरियाच्या गंभीर रुग्णांसह इतरही रुग्णांना ‘प्लेटलेट’, ‘प्लाझमा’, ‘रेड ब्लड सेल्स’ आणि ‘वाईट ब्लड सेल्स’साठी पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून रक्तघटक विकत घ्यावे लागले. मंगळवारपर्यंत मशीन स्थापन झाल्याच्यानंतर त्याचा अहवाल मेडिकल रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते यांनी एफडीएला दिल्यावर चमूने तपासणी केल्यावर रात्री उशिरा मंजुरी दिली. गुरुवारपासून रक्तघटक वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मेडिकल प्रशासनासह रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.