जळगाव : शेतकऱ्यांशी झालेल्या वादानंतर बंद करण्यात आलेले जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी हे केंद्र बंद करण्यात आले होते. आता ते १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, रावेर, जळगाव, अमळनेर येथे तूर खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. यातील जळगाव केंद्र भारतीय अन्न महामंडळांतर्गत असून, अन्य नाफेडतर्फे कार्यरत आहेत. येथे आतापर्यंत १९ हजार ४५ क्विंटल तूर खरेदी झाली. गेल्या काही दिवसांत तूर खरेदीचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)
अखेर तूर खरेदी केंद्र सुरू
By admin | Published: March 24, 2017 1:50 AM