ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. 8 - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना काँग्रेसमध्येच जास्त विरोधक आहेत. विखे आणि माझी चांगली मैत्री आहे, ते माझ्याकडे कधीच चुकीचं काम घेऊन आले नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे कौतुक केले. भविष्यात काय होईल, हे आज सांगणे उचित नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच विखेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा शिर्डीत जोरदार रंगली.
शिर्डी नगरपंचायतीच्या अटल अमृत पाणी योजनेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, गुरू पूजनाच्या मुहूर्तावर सार्इंचा आशीर्वाद मिळाला तसेच साई शताब्दी सोहळा माझ्या काळात होत आहे, हे माझं भाग्यच आहे. अटल अमृत योजनेतून शिर्डीचा पाणी प्रश्न सोडविणार आहे. आता जगभरातील भाविकांसाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत. नगरपंचायतीच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण करणार आहे़ निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे मार्गी लावणार असून, या कामांसाठी साईबाबांचा घेतलेला पैसा परत करणार आहे. भाजपाने राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी दिली. रोज निर्णय बदलत नाही, पण लोकांच्या हितासाठी काही बदल करावा लागतो. पुर्नगठीत कर्जदारांसाठी उचित व्यवस्था केली आहे़ ती लवकरच जाहीर करणार आहे. शिर्डी विमानतळ लवकरच सुरू करुन नाईट लँडिंग सुविधाही सुरु करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे -
गुरू पूजनाच्या मुहूर्तावर साईंचा आशीर्वाद मिळाला...
अटल अमृत योजनेतून शिर्डीचा पाणी प्रश्न सोडविणार..
साई शताब्दी सोहळा माझ्या काळात होईल हे माझं भाग्य..
गिरीशजींनी कुंभमेळा यशस्वी हाताळला..
आता जगभरातील भाविकांसाठी शिर्डीत विकास कामे लवकर करणार...
नगरपंचायतीच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण करणार...
विखेचे स्वपक्षात विरोधक जास्त
हा विरोधी नेता माझ्याकडे कधीच चुकीचं काम घेऊन आला नाही..
विंखेंवर स्तुती सुमने
माझी आणि विखेची मैत्री..
निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे मार्गी लावणार
साईबाबांचा घेतलेला पैसा परत करणार..
राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी...
रोज निर्णय बदलत नाही... पण लोकांच्या हितासाठी काही बदल करावा लागतो..
पुंर्गठीत कर्जदारांसाठी उचित व्यवस्था केलीय लवकरच जाहीर करणार...
भविष्यात काय होईल हे आज सांगणे उचित नाही...
विखेचे नाव न घेता मिश्किल टोला..
शिर्डी विमानतळ लवकरच सुरू करणार...नाईट लाडिंग सुविधेसह सुरू करणार