'प्रमोद महाजनांच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, आता भाजपनं प्रथा मोडली'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 06:03 PM2021-09-20T18:03:54+5:302021-09-20T18:05:20+5:30
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
मुंबई: भाजपने राज्यसभेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका करत एका जुन्या निर्णयाची आठवण करुन दिली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेली राज्यसभेच्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी काँग्रेसची इच्छा आहे.
राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसमधून ६ नेते इच्छुक होते. परंतु त्यात रजनी पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. #Congress#RajyaSabhahttps://t.co/DfjGr9tBWP
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021
बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, प्रमोद महाजन यांचं निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती. पण, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. राजकारणात एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे, पण भाजपने ही प्रथा मोडलीये, असं थोरात म्हणाले.
https://t.co/FgM1Q9X84L
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021
''आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही.''#UmaBharti#BJP4IND
भाजपला विनंती करू
थोरात पुढे म्हणाले की,भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली, हे योग्य नाही. राजकारणात काही संकेत असतात. एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर उमेदवार दिला जात नाही. पण, भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. तरीही आम्ही भाजपला उमेदवार न देण्याची विनंती करू, असं थोरात म्हणाले.