शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

‘गडहिंग्लज’ला दशकानंतर मान!

By admin | Published: May 22, 2015 11:39 PM

जिल्हा बँक : अप्पी पाटील ठरले सहावे उपाध्यक्ष

राम मगदूम - गडहिंग्लज --५० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा राहिलेल्या गडहिंग्लज तालुक्याला तब्बल १० वर्षांनंतर जिल्हा बँकेत मानाचे स्थान मिळाले आहे. बँकेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले विनायक उर्फ अप्पी पाटील हे तालुक्यातून झालेले सहावे उपाध्यक्ष ठरले आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व गडहिंग्लजचे माजी आमदार स्व. बी. एस. पाटील-गिजवणेकर, स्व. डॉ. आर. एस. संकपाळ-दुंडगेकर आणि टी. आर. पाटील-कडलगेकर यांना बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला.दरम्यान, स्व. डॉ. संकपाळ, स्व. शिवाजीराव पाटील-भडगावकर, स्व. राजकुमार हत्तरकी, टी. आर. व भैयासाहेब कुपेकर यांना बँकेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांच्यानंतर हा मान अप्पींना मिळाला आहे. उपाध्यक्षपदानंतर डॉ. संकपाळ व टी.आर.ना अध्यक्षपदाचाही बहुमान मिळाला.स्वातंत्र्यपूर्व काळातील जिल्ह्याचे नेते स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कट्टर अनुयायी बी. एस. पाटील, डॉ. संकपाळ व शिवाजीराव पाटील ही मंडळी तालुक्यात नेतृत्व करीत होते. रत्नाप्पाण्णांमुळेच त्यांना जिल्हा बँकेचा पदाधिकारी होण्याचा मान मिळाला. त्यानंतर स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्यामुळे टी. आर. पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. मात्र, जिल्ह्यात कुणीही गॉडफादर नसतानादेखील अप्पी पाटील यांनी बँकेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे.सर्वपक्षीय ‘अप्पी’पूर्वीपासून काँगे्रसप्रेमी राहिलेल्या महागावच्या वतनदार पाटील घराण्यात अप्पींचा जन्म झाला. सरपंचपदापासून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली. गडहिंग्लज कारखान्यात ते जनसुराज्यकडून संचालक आहेत. जिल्हा परिषदेत ते राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. आता काँगे्रसतर्फे ते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष झाले आहेत. यांना मिळाला अध्यक्षपदाचा मानबी.एस.पाटील- २१ मार्च १९६७ ते ८ मार्च १९६९आर. एस. संकपाळ- ११ मार्च १९८२ ते ११ मार्च १९८३टी. आर. पाटील- ९ डिसेंबर २००६ ते २२ नोव्हेंबर २००७यांना मिळाली उपाध्यक्षपदाची संधी आर. एस. संकपाळ- १९७१ ते १९७२शिवाजीराव पाटील- १९८४ ते १९८५राजकुमार हत्तरकी- २००० ते २००१टी. आर. पाटील- २००१ ते २००२भैयासाहेब कुपेकर - २००३ ते २००४अप्पी पाटील - २०१५