शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पराभूत होताच नगर‘सेवा’ बंद

By admin | Published: February 28, 2017 1:14 AM

कचरा वाहतूक गाड्या, पाण्याचे टँकर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नगरसेवकांनी लगेचच बंद करून टाकले.

पुणे : नगरसेवक असताना प्रभागातील काही भागांमध्ये स्वखर्चाने सुरू केलेल्या कचरा वाहतूक गाड्या, पाण्याचे टँकर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नगरसेवकांनी लगेचच बंद करून टाकले. नागरिकांच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर ही बाब उघड झाली. १५ पैकी किमान १० क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असा प्रकार झाला असल्याची माहिती मिळाली.शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, तसेच पर्वती, लोकमान्यनगर, राजेंद्रनगर व अन्य काही परिसरांतील प्रभागांमध्ये असे प्रकार झाले आहेत. पालिकेच्या कचरा वाहतूक विभागाला एखाद्या प्रभागातील सर्व ठिकाणचा कचरा उचलणे शक्य होत नाही. काही भागांमध्ये नळाला पाणी येण्यात अनेक अडचणी असतात. त्या भागातील नागरिक साहजिकच संबंधित नगरसेवकांकडे याच्या तक्रारी करीत असतात. शहराच्या झोपडपट्टी तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या वसाहतींमध्ये प्रामुख्याने या प्रकारच्या समस्या असतात.अधिकाऱ्यांकडे नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कचरा वाहतूक करणारी वाहने त्या परिसरात नियमित पाठवणे त्यांना शक्य होत नाही. कधी वाहने अपुरी, तर कधी चालकच उपलब्ध नाही, वाहन आहे तर कर्मचारी नाही, अशा अनेक अडचणी नगरसेवकांनाही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लक्षात येतात. नागरिक म्हणजेच मतदार दुरावला जायला नको, यासाठी काही नगरसेवकांनी यावर उपाय म्हणून स्वखर्चाने काही ठिकाणी कचरा वाहतूक करणारी वाहने पाठवायला सुरुवात केली. तीच नंतर कायम झाली. पाण्याचे टँकरही याच पद्धतीने काही नगरसेवकांनी पुरवले होते.या सेवेच्या बळावरच त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. मात्र कुठेतरी काहीतरी चुकले व त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर लगेचच त्यांनी ही स्वखर्चाने केलेली सेवा बंद करून टाकली. त्याआधी त्या भागातील नागरिकांना काही कळवलेही नाही. कचरा वाहतूक करणारी वाहने बंद झाल्यामुळे त्या परिसरात कचरा साचून राहू लागला. पाणी मिळत होते तिथे पाणी मिळेनासे झाले. पराभूत नगरसेवकाला सांगायचे कसे, म्हणून नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. तक्रारींची संख्या वाढू लागल्यावर अधिकाऱ्यांनी चौकशी केली, तर त्यातून ही बाब उघड झाली.।पालिकेची पर्यायी व्यवस्था पालिकेने आता या परिसरात पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यासाठी त्यांना कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले. मुळातच अशा वाहनांची संख्या अपुरी आहे, चालक अडचणीच्या ठिकाणी जायचा कंटाळा करतात, वेळा पाळत नाही, सुट्या घेतात. हे सगळे सांभाळून अधिकाऱ्यांना नव्या वाहनांची व्यवस्था करावी लागली. पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. १५ पैकी किमान १० क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जुन्या नगरसेवकांनी सेवा बंद केल्या आहेत़