गडचिरोली- महाराष्ट्रात जवळपास 40 वर्षांनंतर नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलानं सर्वात मोठी कारवाई केली आहे. रविवारी गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 16 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. यात काही उच्चपदस्थ कमांडर आणि महिला नक्षलींचा समावेश आहे. या एन्काऊंटरनंतर जवानांनीही मोठा जल्लोष केला. जवानांनी सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका धरला आहे.एएनआयनं नाचणा-या जवानांचा व्हिडीओ शेअर केला. भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडगावपासून 7 किमी अंतरावरील कसनासूर जंगलात पोलिसांचे जवान गस्त घालत होते. नक्षल्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. धुमश्चक्रीनंतर काही नक्षलवादी पळाले. संध्याकाळपर्यंत 16 नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. सर्व मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले.
गडचिरोली एन्काऊंटरनंतर जवानांनी धरला सपना चौधरीच्या गाण्यावर ठेका, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 10:29 AM