मुंबई : उत्तर भारतात बहुतांशी राज्यांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असतानाच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गुरुवारसाठी मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात उष्माघाताचे प्रकार वाढत असून सातारा जिल्ह्यात दोन दिवसांत चार जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.
विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ अशा जिल्ह्यांत २२ एप्रिलपासून वळवाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे. खान्देश, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अक्षय तृतीयेनंतरही वळवाच्या वातावरणाचा परिणाम टिकून राहील. मराठवाड्यात गुरुवारी गारपिटीची शक्यता आहे. विदर्भात अवकाळी वातावरण गुरुवारपासून डोकावणार असून, ५ ते ७ दिवस टिकून राहील. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी
ही घ्या काळजी n शक्यतो उन्हाच्या आधी महत्त्वाची कामे आटोपाn तीव्र उन्हात बाहेर जाताना रुमाल, छत्री, सनगॉगल वापरा. n पाण्याची बाटली बाळगा. n भरपूर पाणी प्या n कूलर किंवा एसीतून एकदम उन्हात जाणे किंवा उन्हातून एकदम एसी कूलरच्या गारव्यात जाणे टाळा.
कोणते जिल्हे होरपळत आहेत?रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
गारव्यासाठी वाढली विजेची मागणी : मुंबईसह राज्यभरात वाढत्या उकाड्यामुळे पंखा, एसी आणि कूलरचा वापरही वाढला आहे. परिणामी विजेच्या मागणीत वाढ होत आहे. मंगळवारी राज्यभरातून सुमारे २८ हजार मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. दुपारपर्यंत मुंबई वगळता राज्यभरातून २३ हजार ७८५ मेगावॅट, दुपारी ४ वाजेपर्यंत २४ हजार ३२६ मेगावॅट विजेची मागणी नोंद झाली. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीजवाहिन्यांच्या जाळ्यावरून बुधवारी २ हजार ४२ मेगावॅट एवढ्या विजेची मागणी नोंदविण्यात आली. तर १ हजार ८४० मेगावॉटचा पुरवठा करण्यात आला.
शनिवारपर्यंत मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानाचा पारा चढाच राहील, अशी माहिती वेगरिज ऑफ दी वेदरचे राजेश कपाडिया यांनी दिली.
राज्यभरातील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्येसोलापूर ४२.२ ठाणे बेलापूर ४२ मालेगाव ४२ जळगाव ४१.९ जालना ४१.७ परभणी ४१.५ बीड ४१.५ धाराशिव ४०.३ पुणे ४० सातारा ३९.९ बारामती ३९.६ कोल्हापूर ३९.५ सांगली ३९.७ अहमदनगर ३९.७ नाशिक ३८.८ मुंबई ३८.८ लोणावळा ३७माथेरान ३६.४