शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी

By admin | Published: July 14, 2017 10:05 AM

लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात गुरुवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरू आहे. गेल्या 18 तासांमध्ये शहरात तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 14 -  लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात गुरुवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरू आहे. गेल्या 18 तासांमध्ये शहरात तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील नदीनाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत.
 
जून महिन्यात जोरदार सरी बरसल्यानंतर मागील आठवड्या भरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर गुरुवारी पावसाचे पुनरागमन झाले आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून लोणावळ्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली  ती संततधार अद्यापही कायम आहे. 
 
गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यत 213 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही रस्ते जलमय झाले आहेत. डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून धरणांने 50 टक्क्याचा टप्पा ओलांडला आहे.
 
तर दुसरीकडे,  नाशिक शहर परिसरात गुरुवारी ( 13 जुलै ) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड परिसराला पाण्याचा वेढा पडला असून परिसरातील व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.
दशक्रिया विधिसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाल्याने परिसरातील धर्मशाळेतच सध्या धार्मिक विधि सुरू आहेत. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.