ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - तांत्रिक बिघाडानंतर आता मुंबई मेट्रोची वाहतूक पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती मुंबई मेट्रोनं दिली आहे. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी मुंबई मेट्रोच्या सेवेत तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.
या बिघाडामुळे घाटकोपर-वर्सोवा या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं होते. तर अंधेरी ते वर्सोवा ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गाड्या पुढे जात नसल्यानं अंधेरी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती व कार्यालय गाठण्यास उशीर होत असल्यानं प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली.
मात्र, मुंबई मेट्रो प्रशासनानं तातडीनं बिघाड दुरुस्त करुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर केली. तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Fault repaired, services resumed new trains inducted to manage crowd. Normal frequency should resume in few minutes. #Mumbaimetro— Mumbai Metro (@MumMetro) June 29, 2017
Technical fault repaired, full services will be resumed in next few minutes thank you for your patience. #Mumbaimetro— Mumbai Metro (@MumMetro) June 29, 2017
The services between Ghatkopar and Andheri are running smoothly. Inconvenience regretted. #MumbaiMetro (2/2)— Mumbai Metro (@MumMetro) June 29, 2017