मुंबई : तापमानातील वाढ १९७० सालापासून सातत्याने नोंदवली जात आहे. १९७० मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यात तापमानातील वाढ थेट ४० अंश सेल्सिअसवर नोंदवली गेली.
१९७० ते २०२४ या वर्षात तापमानवाढीत कधीच घसरण झाली नाही. याउलट राजस्थान, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा पाराही वाढला असून, आता होळी साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तरी यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
पूर्वी मार्च महिन्यात उष्णतेच्या झळा अभावाने दिसून यायच्या. सद्य:स्थितीत जगभरात होणारी तापमान वाढ, वाढत्या उष्णतेच्या लहरी, सतत वाढणारे तापमान हा घटनाक्रम सातत्याने दिसून येत आहे. यंदाच्या मार्च महिन्यातही हीच परिस्थिती आहे. भविष्यात मार्च महिना जास्त उष्णतेचा महिना म्हणून नोंदवला जाईल. - महेश पलावत, उपाध्यक्ष, क्लायमेट चेंज