शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कासकरपाठोपाठ छोटा राजनचा हस्तक डी. के. रावला बेड्या ; मुंबई गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता कक्षाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 5:06 AM

ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या मुसक्या आवळल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी छोटा राजनचा विश्वासु हस्तक रवी मल्लेश व्होरा उर्फ डी. के. रावला बेड्या ठोकल्या आहेत. अँ

मुंबई : ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या मुसक्या आवळल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी छोटा राजनचा विश्वासु हस्तक रवी मल्लेश व्होरा उर्फ डी. के. रावला बेड्या ठोकल्या आहेत. अँटॉपहिलच्या एसआरए प्रकल्पाअंतर्गत प्रवर्तकाला धमकावत त्याच्याकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.रावविरुद्ध यापूर्वी मकोकाअंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध ४७ गुन्हे दाखल असून, हा ४८वा गुन्हा आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात तो कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्यानंतर तो धारावी परिसरात राहायचा. तो छोटा राजनच्या संपर्कात होता.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अँटॉपहिल येथील निर्मल नगर को-आॅप. सोसायटीचा २०१३पासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत प्रकल्प सुरू आहे. एक हजार रहिवाशांचा यात समावेश आहे. तक्रारदाराने या रहिवाशांना एकत्र केले होते. मोबदला म्हणून दोन कोटी आणि दोन फ्लॅट बांधकाम व्यावसायिकाने द्यावे असा व्यवहार ठरला होता. ही बाब डीकेच्या लक्षात येताच त्याने प्रवर्तकाला प्रकल्पातून हटण्यास सांगितले. मात्र प्रवर्तकाने त्यास नकार दिला. अखेर रावने त्याच्याकडे ५० लाखांची मागणी केली.तक्रारदाराने मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गुप्तवार्ता कक्षाचे पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या पथकाने रावच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तपासात त्याने खंडणी मागितल्याचे उघड होताच गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता कक्षाने (सीआययू) सापळा रचला. गुरुवारी शिताफीने त्याला खंडणी, धमकावण्याप्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासह आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात त्याला मदत करणाºयांचाही शोध घेत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने त्याच्या खंडणीची पद्धत बदलली. मात्र खंडणी घेण्याचे काम सुरू होते. धारावी, अँटॉपहिल परिसरातील अनेक व्यावसायिक, ठेकेदारांकडून त्याने खंडणी उकळल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. त्याच्याविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने तक्रारदार शोधण्यास सुरुवात केली.लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या मुसक्या आवळल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने गुरुवारी छोटा राजनचा विश्वासु हस्तक रवी मल्लेश व्होरा उर्फ डी. के. रावला बेड्या ठोकल्या आहेत. अँटॉपहिलच्या एसआरए प्रकल्पाअंतर्गत प्रवर्तकाला धमकावत त्याच्याकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.रावविरुद्ध यापूर्वी मकोकाअंतर्गत कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याच्याविरुद्ध ४७ गुन्हे दाखल असून, हा ४८वा गुन्हा आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात तो कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर आला होता. त्यानंतर तो धारावी परिसरात राहायचा. तो छोटा राजनच्या संपर्कात होता.गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, अँटॉपहिल येथील निर्मल नगर को-आॅप. सोसायटीचा २०१३पासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत प्रकल्प सुरू आहे. एक हजार रहिवाशांचा यात समावेश आहे. तक्रारदाराने या रहिवाशांना एकत्र केले होते. मोबदला म्हणून दोन कोटी आणि दोन फ्लॅट बांधकाम व्यावसायिकाने द्यावे असा व्यवहार ठरला होता. ही बाब डीकेच्या लक्षात येताच त्याने प्रवर्तकाला प्रकल्पातून हटण्यास सांगितले. मात्र प्रवर्तकाने त्यास नकार दिला. अखेर रावने त्याच्याकडे ५० लाखांची मागणी केली.तक्रारदाराने मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधला. पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे गुप्तवार्ता कक्षाचे पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांच्या पथकाने रावच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तपासात त्याने खंडणी मागितल्याचे उघड होताच गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता कक्षाने (सीआययू) सापळा रचला. गुरुवारी शिताफीने त्याला खंडणी, धमकावण्याप्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासह आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात त्याला मदत करणाºयांचाही शोध घेत असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने त्याच्या खंडणीची पद्धत बदलली. मात्र खंडणी घेण्याचे काम सुरू होते. धारावी, अँटॉपहिल परिसरातील अनेक व्यावसायिक, ठेकेदारांकडून त्याने खंडणी उकळल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. त्याच्याविरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने तक्रारदार शोधण्यास सुरुवात केली.सीसीटीव्हीचा पहारा-डी. के . राव याने घरापासून १ किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही बसविले होते. त्याचा अ‍ॅप त्याच्या मोबाइलवर असे. भेटण्यासाठी येणाºया व्यक्तीची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच त्याला रावला भेटण्यासाठी सोडण्यात येत असे.

बारबालेवर उधळलेले खंडणीचे सोने हस्तगत-खंडणीपोटी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून उकळलेल्या ४० तोळे सोन्यापैकी ४ तोळे सोने खंडणीविरोधी पथकाने एका बारबालेकडून हस्तगत केले. आरोपींनी हे सोने तिला दिले होते.खंडणीप्रकरणी कासकरसह चौघांना खंडणीविरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली. जागेच्या वादातून खंडणी उकळल्याचे तीन गुन्हे त्यांच्याविरुद्ध दाखल आहेत. ठाण्यातील सराफा व्यावसायिकाकडून त्यांनी ४० तोळे सोन्याची खंडणी उकळली होती. त्या सोन्यापैकी २० तोळे सोने कासकरच्या हस्तकांनी मालाड येथील सराफा व्यावसायिकास विकले होते. ते सोने पोलिसांनी हस्तगत केले. काही सोने बारबालेस दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलिसांनी बारबालेला शोधून काढले. तिला एक हार आणि कर्णफुले त्यांनी दिली होती. तिने हे दागिने एका सराफा व्यावसायिकाकडे गहाण ठेवले होते. त्याच्याकडून जवळपास ४२ ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांनी आतापर्यंत २४ तोळे सोने हस्तगत केले आहे. उर्वरित १६ तोळ्यांसाठी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हाIqbal Kaskarइक्बाल कासकर