१) पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालापेक्षा विधानसभेच्या निकालात अनेक वैशिष्टपूर्ण बदल पाहायला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत १०० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेणाऱ्या शिवसेनेला विधानसभेत केवळ ६३ जागा जिंकता आल्या. त्याचवेळी काँग्रेसला अर्थातच ३७ जागांवरील शिवसेनेच्या जनाधारात पाचच महिन्यात घट झाल्याचे दिसून आले. तर भाजपाने लोकसभेच्या वेळी १३२ जागांवर आघाडी घेतली होती. विधानसभेत त्यांना १२२ जागा जिंकता आल्या़ म्हणजेच युती तुटल्यानंतर त्यांचे केवळ १० जागांचेच नुकसान झाले. २) मे महिन्यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने विधानसभेच्या २८८ पैकी २४४ जागांवर आघाडी घेतली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीतील सर्व पक्षांनी मिळविलेल्या जागांची एकूण संख्या १८६ आहे. म्हणजेच ५८ जागांवर या पक्षांचे नुकसान झाले. उलटपक्षी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला केवळ १४ विधानसभा क्षेत्रांमध्ये आघाडी घेता आली होती. परंतु विधानसभेत काँग्रेसला ४२ जागा राखता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसही लोकसभेत २६ जागांवर आघाडीवर होता आणि आता त्यांना ४१ जागा जिंकता आल्या. त्याचवेळी मतांच्या टक्केवारीमध्येही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत वैविध्य दिसून आले. ३) काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत ०.१ टक्क्याची लहानशी वाढ झाली, मात्र राष्ट्रवादीला मिळालेली मतांची टक्केवारी १.२ ने वाढल्याचे दिसून आले. भाजपाच्या मताधिक्यातही ०.५ ची वाढ झाली. परंतु शिवसेनेला मिळालेल्या मतांमध्ये मात्र १.३ टक्क्यांची मोठी घट झाल्याचे विधानसभा निकालावरून स्पष्ट झाले. विदर्भात शिवसेनेला लोकसभेच्या वेळी १९ टक्के मते मिळाली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत याच विदर्भाने १२.३ टक्के मते दिली. अन्यत्रही सेनेच्या मताधिक्यात घट झालेली पाहायला मिळते. काँग्रेसने अधिक मताधिक्य विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात घेतले आहे. तर लोकसभेत भोपळाही फोडू न शकलेल्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला या वेळी ७ जागा जिंकता आल्या आहेत.
लोकसभेनंतर शिवसेनेची ३७ जागांवर पिछाडी
By admin | Published: October 22, 2014 6:07 AM