ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 11 - समृद्ध जीवनचा संस्थापक महेश मोतेवारला अटक केल्यानंतर आता त्याची पत्नी पत्नी लीना मोतेवारलाही अटक करण्यात आली आहे. सीआयडीने अटकेची कारवाई केली आहे. कंपन्यांमधील गैरव्यवहाराप्रकरणी लीना मोतेवारवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अगोदरच महेश मोतेवारला अटक झाली असताना आता पत्नीलाही अटक झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.
समृद्ध जीवन चिटफंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सीआयडी महेश मोतेवारची चौकशी करत आहे. तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे लीना मोतेवारला अटक करण्यात आली आहे.
महेश मोतेवारसह लीना मोतेवारदेखील समृद्ध जीवनच्या अनेक कंपन्यांची संचालिका आहे. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. लीना मोतेवारचादेखील गैरव्यवहारात सहभाग असल्याने अटक करण्यात आली आहे.