निर्णय घेतल्यावर माहित होता नये...; अजित पवारांवरून बावनकुळेंचे महत्वाचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:23 PM2023-08-31T12:23:38+5:302023-08-31T12:24:04+5:30

इंडिया नावाच्या शब्दाला टिंब लावणे योग्य नाही. अनेक पक्षांकडे एक मत नाही. तसेच हा प्रयोग काही नवीन नाही, यापूर्वी असे प्रयोग झाले आहेत. - बावनकुळे

After making a decision, one should not know...; Important statement of Chandrashekhar Bawankule from Ajit Pawar | निर्णय घेतल्यावर माहित होता नये...; अजित पवारांवरून बावनकुळेंचे महत्वाचे वक्तव्य

निर्णय घेतल्यावर माहित होता नये...; अजित पवारांवरून बावनकुळेंचे महत्वाचे वक्तव्य

googlenewsNext

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांनी घेतलेला निर्णय बदलल्याचा प्रकार बुधवारी घडला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी वक्तव्य केले आहे. 

तिन्ही नेत्यांना एकमेकांचे निर्णय एकमेकांना माहीत असले पाहिजे, निर्णय घेताना कळले पाहिजे. निर्णय घेतल्यावर माहिती होता नये. चार लोकांनी घेतलेला निर्णय अधिक प्रभावी असेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाठी हा महत्वाचा निर्णय असून त्या निर्णयाचे स्वागत करतो. त्यामुळे एखाद्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयात दुसरा नेता आणखी एडिशन करून त्याची निर्णयाची ताकदच वाढवेल, असे बावनकुळे म्हणाले. 

इंडिया नावाच्या शब्दाला टिंब लावणे योग्य नाही. अनेक पक्षांकडे एक मत नाही. तसेच हा प्रयोग काही नवीन नाही, यापूर्वी असे प्रयोग झाले आहेत. देशात दिसले पाहिजे म्हणून बैठका घेत आहेत, यांच्या मागे जनता नाही, कमळ चिन्हाचा उमेदवार निवडून येईल. NDA ची आमची बैठक झाली आहेत. आम्ही तिन्ही पक्षातील नेत्यांकडे किती जागा आहे, या संदर्भात विभागनुसार बैठक घेणार आहे. INDIA  फुलपाखरासारखे आले त्यांची नवीन बैठक आहे. आमच्या बैठकीत नवीन काही नाही. यापूर्वी आमच्या बैठका झालेल्या आहेत, असा टोला बावनकुळेंनी हाणला. 

विरोधी पक्ष नेता बनवता येईल एवढ्या सुद्धा जागा मिळणार नाहीत. सर्व्हेत ज्यांचं नाव येतेय, उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानाचे डोहाळे लागले आहेत. त्यांच्यासाठी सर्व्हे केला आणि त्यांनीच उद्धव ठाकरे यांचे नाव दाखवले आहे. ते कुठून लोकसभा लढणार, निवडण्याचे निर्णय झाला नाही, यांच्यात एकमत होणार नाही, ठिणगी पडेल. मोदीच पंतप्रधान होणार आहेत. काँग्रेसला विरोधीपक्ष नेता बनवता येणार नाही, अशी टीका बावनकुळेंनी केली. 

कुणीही संयोजक झाले तरी काही होणार नाही. हे त्या डबक्यात कुदतील आणि त्या डब्यक्यात राहतील. हे नेते देशव्यापी काहीच करू शकणार नाही. देशाला उंची देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हे तर डब्यात राहणारे लोक आहे. किंचित सेना शिल्लक सेना तीन साडेतीन जिल्ह्यात प्रभाव असणारे, काही कोकणपुरते मर्यादित आहेत, अशी टीका बावनकुळेंनी केली. 

Web Title: After making a decision, one should not know...; Important statement of Chandrashekhar Bawankule from Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.