शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

राज्यसेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही ३७७ उमेदवारांचे प्रशिक्षण रखडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 7:50 PM

राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून त्यामध्ये ३७७ उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी अशा विविध पदांवर निवड झाली.

पुणे : राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागून त्यामध्ये ३७७ उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी अशा विविध पदांवर निवड झाली. मात्र समांतर आरक्षणाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेमुळे त्यांना सेवेत रूजू करून घेऊन प्रशिक्षणाला पाठविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे राज्यसेवाच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रकच कोलमडले आहे.  

          राज्यसेवा परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांपैकी ज्यांचा या याचिकेशी संबध नाही तसेच ज्या उमेदवारांच्या अंतिम निकालावर याचिकेमध्ये दिल्या निकालाचा परिणाम होणार नाही अशांना सेवेत रूजू करून घेण्याची मागणी पात्र उमेदवारांकडून करण्यात येत आहे. केवळ १७ उमेदवारांच्या निकालावर या याचिकेचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यांच्यासाठी उर्वरित ३६० उमेदवारांचे प्रशिक्षण स्थगित ठेवणे योग्य नसल्याची भावना उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.  

          राज्यसेवा परीक्षा २०१७ ची मुख्य परीक्षा ही सप्टेंबर २०१७ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल हा मे २०१८ मध्ये जाहीर झाला. या निकालामध्ये १७ उमेदवारांची निवड ही उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील याचिका क्र. ४१५९/२०१८ यातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात आला. मात्र आता अचानक सर्व ३७७ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविणे स्थगित केले आहे.  या परिक्षेत खुला(महिला) संवर्गाकरीता ५५ जागा व खुला(खेळाडू) संवर्गाकरीता ८ जागा वगळता इतर जागांबाबत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. तथापि सर्वच उमेदवारांची नियुक्ती रखडल्याने उत्तीर्ण उमेदवारांमध्ये मोठया प्रमाणात नाराजीची भावना निर्माण झाली आहे. 

            न्यायालयात सुरू असलेल्या मुळ समांतर आरक्षणाविषयीच्या याचिकेवर शासनाची बाजू मांडण्याकरीता महाधिवक्तांची उपस्थिती असणे आवश्यक असते.मात्र गेल्या दोन महिन्यांपासून महाधिवक्ता सुनावणीस उपस्थित राहू न शकल्याने याचिकेचे काम पुढे सरकण्यात अडचणी येत आहेत. काही उत्तीर्ण उमेदवारांनी याप्रकरणी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. तथापि शासनाने या हस्तक्षेप याचिकेबाबत ही कोणतीही भुमिका न घेतल्याने उत्तीर्ण उमेदवार हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी