सिंधुदुर्ग, दि. 21 - कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी आज कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह पक्षातील सर्वच नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नसतानाही ते प्रदेशाध्यक्ष आहेत असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेसचं दुकान लवकरच बंद होणार असल्याचा दावा केला.
48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बट्याबोळ केला आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचं दुकान लवकरच बंद होणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस सोडतील असं राणे यावेळी म्हणाले .
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले होते. त्यामुळे आज (गुरुवारी) राणे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांनी पक्षाला रामराम ठोकत कॉंग्रेससोबत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं.
नारायण राणेंच्या भाषणातील मुद्दे -
तुम्ही काय मला काढणार मीच कॉंग्रेस सोडतो
संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून पुढील निर्णय घेणार, नागपूरपासून माझ्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे
शिवसेनेचे जवळपास 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
काँग्रेसचं महाराष्ट्रातलं दुकान बंद होणार
नितेश राणेंच काय काँग्रेस आणि शिवसेनेतीलही अनेक आमदार राजीनामा देतील
भाजपपुढे नाक घासतात, उद्धव ठाकरेंना नाकच नाही राहिलं
दसऱ्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन मी माझी पुढची रुपरेषा स्पष्ट करेन
नितेश राणेंबाबत योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ
महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही
सर्वात वरिष्ठ असूनही गटनेतेपद दिलं नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी रणपिसेंना गटनेता केलं
48 जणांनी नारायण राणेंना मुख्यमंत्री करा,असं सांगूनही माझं नाव घोषित न करता अशोक चव्हाणांचं नाव जाहीर केलं
12 वर्षे काँग्रेसनं माझा उपयोग करुन घेतला
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून अनेक जण काँग्रेस सोडतील
शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष रिकामे करणार
महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो
आम्हाला सहा महिने द्या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असं अहमद पटेल मला सुरुवातीला म्हणाले होते
अहमद पटेल म्हणाले, सहा महिने द्या मुख्यमंत्री करु
अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन विलासराव देशमुखांविरोधात तक्रार केली
काँग्रेसमध्ये माझ्याशी कसे वागले त्यांच्याबाबत मी आज सांगणार आहे
26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, 27 तारखेला मुंबईत महसूल मंत्री म्हणून फिरलो
विलासराव देशमुखांविरुद्ध मॅडमला जे सांगायला सांगितलं ते बोललो. अहमद पटेल म्हणाले थोड्या दिवसात शपथविधी होईल, पण झाला नाही
मला मँडमनं दोनदा सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार
तीन वेळा मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन, वर्ष गेलं पण पद मिळालं नाही, अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केलं
मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन काँग्रेसनं पाळलं नाही
महसूल मंत्रिपद काढून उद्योग खातं दिलं तेव्हाच राजीनामा देणार होतो
4 वेळा मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली