अहमदनगर : कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. यांच्यानंतर आता शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे.
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या वाहनचालकाला त्रास जाणवू लागल्याने त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर सदाशिव लोखंडे यांनी आपल्यासह कुटुंबीयांची कोरोना रॅपिड चाचणी केली. त्यावेळी सदाशिव लोखंडे आणि त्यांची पत्नी आणि मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. याशिवाय, सदाशिव लोखंडे यांच्या संपर्कातील आणखी दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या सदाशिव लोखंडे यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला आणण्यात येत आहे.
दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोल्हापुरात यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांवरही सध्या उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याता साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
आणखी बातम्या...
- "काँग्रेसमधील बहुतेक नेते भाजपाच्या कॉलची वाट पाहतायेत"
- चेतन चौहान यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा, शिवसेनेची मागणी; पण...
- "राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"
- बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब
- गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!
- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल
- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!