शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वा-यावर

By admin | Published: July 05, 2017 9:11 PM

मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणाला बळ मिळावे म्हणून राज्य शासनाने गतवर्षी सुरू केलेली ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ पहिल्याच वर्षी निधीअभावी

ऑनलाइन लोकमत 
 
कोल्हापूर, दि. 05 - मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणाला बळ मिळावे म्हणून राज्य शासनाने गतवर्षी सुरू केलेली ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ पहिल्याच वर्षी निधीअभावी निराधार बनली आहे. या विद्यार्थ्यांना गतवर्षीची शिष्यवृत्ती नक्की कधी मिळणार, यासंबंधीचे उत्तर समाजकल्याण विभागाकडे नाही. राज्यभरातील तब्बल सात हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असतानाही एकाही दलित संघटनेला त्याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र पुढे आले आहे.
स्वाधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरातून १९ हजार मुला-मुलींचे अर्ज आले होते. त्यांतील सात हजार विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. शासनाने योजना जाहीर केली; परंतु त्याचे लेखाशीर्ष तयार करून निधीचे वाटप न झाल्याने ती कागदावरच राहिली आहे. त्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २८ जूनच्या अंकात राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यामुळे ही रक्कम कधी मिळणार यासंबंधीची विचारणा अनेक विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे केली. त्यामुळे त्यासंबंधीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी फोन उचलला नाही. समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांच्याशी मंगळवारी (दि. ४) दुपारी तीन वाजता संपर्क साधला. त्यांनी ‘माझ्याकडे आता ही माहिती उपलब्ध नाही. अर्ध्या तासात परत फोन करा; मी आपल्याला माहिती देतो,’ असे सांगितले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळपर्यंत चार वेळा व बुधवारी चार वेळा त्यांच्याशी संपर्क साधला. फोन उचलत नाहीत म्हणून मोबाईलवर मेसेज दिला तरी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद नाही. राज्य सरकार या विद्यार्थ्यांचे पैसे देणार नाही म्हणून अशी टाळाटाळ केली जात आहे की काय, अशी शंका त्यामुळे येऊ लागली आहे.
कोल्हापूरसह राज्यभरही रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आहेत. दलित समाजावर अन्याय झाल्यावर पेटून उठणाºया संघटनांचे तर पेवच फुटले आहे. महासंघ तर किती आहेत याची संख्याच मोजता येत नाही; परंतु या लोकांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत रस नाही; कारण त्यांना अशा विषयांतून हाती काही लागत नाही. गैरव्यवहाराची प्रकरणे असली की अधिकाºयांवर दबाव टाकून आंदोलनाची भीती दाखविता येते व त्यातून जे हवे ते साध्य होते. त्यामुळे अशी आंदोलने जोमात आहेत; परंतु मुलांचे भवितव्य ठरविणाºया व बाबासाहेबांच्या नावाने सुरू असलेल्या योजनेला सरकारने हरताळ फासला आहे. तथापि त्याबद्दल सरकारला जाब विचारण्यास दलित संघटनांना व पक्षांनाही सवड नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या विद्यार्थी व पालकांतून व्यक्त होत आहेत.  
 
अशी मिळणार रक्कम...
१) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना : दरवर्षी ६० हजार रुपये
२) इतर महसूल विभागीय शहरांतील व उर्वरित ‘क’ वर्ग महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना : ५१ हजार 
३) इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना : ४३ हजार 
 
दृष्टिक्षेपात वसतिगृहे... 
मागासवर्गीय मुला-मुलांची राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहे. त्यात मुलांची २३४ आणि मुलींची २०७ वसतिगृहे आहेत. त्यांतील २२४ वसतिगृहे शासकीय इमारतीत असून २१७ भाड्याच्या इमारतीत आहेत. वसतिगृहांतील मुलांची मान्य संख्या २१ हजार ६२० असून मुलींची मान्य संख्या १९ हजार ८६० (एकूण ४१ हजार ४८०) आहे.