शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

सात वर्षांनंतरही जिल्ह्यात मनसेची बाल्यावस्था कायम

By admin | Published: October 20, 2014 10:08 PM

मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोकणाकडे विशेष लक्ष दिलेले नाही,

रत्नागिरी : मोठ्या डामडौलात स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेइतके नाही, पण शिवसेनेच्या खालोखाल यश मिळेल, अशी अटकळ मनसेच्या स्थापनेप्रसंगी केली जात होती. मात्र, मनसेचे कोकणाकडे असलेले दुर्लक्ष आणि मनसे स्वतंत्र झाल्यानंतरही न फुटलेली शिवसेना यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मनसेला मतांमधील आपला वाटा वाढवता आलेला नाही. त्यादृष्टीने मनसे अजूनही बाल्यावस्थेतच आहे.कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेला सर्वात मोठे यश प्रथम कोकणानेच मिळवून दिले. याच शिवसेनेतून मनसे वेगळी झाली. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक मात्र शिवसेनेसोबतच ठाम राहिले. शिवसेनेतून एकही मोठा पदाधिकारी मनसेकडे वळला नाही. त्यामुळेच कोकणात विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेची वाढ झाली नाही. शिवसैनिकांनी पक्ष बदलला नाही. या कारणाबरोबरच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कोकणाकडे विशेष लक्ष दिलेले नाही, हेही तेवढेच खरे. त्यामागची समीकरणे अजून फारशी स्पष्ट झालेली नाहीत. पण, त्यांनी कोकणात आपला पक्ष वाढवण्यासाठी कोणताही विशेष प्रयत्न केलेला नाही, हे खरे आहे.पक्षाकडून दुर्लक्ष होत असतानाही कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर यांनी एका बाजूने मनसे वाढवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. अडीअडचणीला धावून जाणे, महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये पुढाकार घेणे, या त्यांच्या कामामुळे खेड आणि लगतच्या दापोलीमध्ये मनसेने थोडे हातपाय पसरले. त्यामुळे खेड नगर परिषद आणि दापोली नगरपंचायतीत मनसेने आपला वाटा मिळवला. पण, मनसेची ही घोडदौड फार काळ सुरू राहिली नाही. कारण मनसेकडे तळागाळातील कार्यकर्तेच नाहीत. आजच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस अत्यंत क्षीण झाली आहे. तरीही ग्रामीण भागात आजही काँग्रेसकडे थोडेफार कार्यकर्ते सापडतात. मनसेची अवस्था त्याहीपेक्षा खराब आहे. मनसेकडे तळागाळापर्यंत जाऊन काम करणारे कार्यकर्तेच नाहीत. केवळ तळागाळातील कार्यकर्तेच नाहीत, तर अनेक ठिकाणी पुरेसे पदाधिकारीही नाहीत. जे आहेत, त्यांच्यासमोर कसलाही कार्यक्रम नाही. पक्षाकडून सदस्य नोंदणीची मोहीम नाही.२00९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने रत्नागिरी जिल्ह्यात पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. दापोली मतदार संघात संतोष शिर्के यांनी १२ हजार ४८१ मते मिळवली होती. गुहागर मतदार संघात वैभव खेडेकर यांनी ६ हजार ८६0 मते घेतली. चिपळुणात सूर्यकांत साळुंके यांनी १0 हजार ६४२ मते मिळवली. रत्नागिरीत अ‍ॅड. संकेत घाग यांनी ५ हजार ६१७ मते मिळवली. राजापुरात अविनाश सौंदळकर यांनी ५ हजार ३९0 मते मिळवली. म्हणजेच २00९ साली रत्नागिरी जिल्ह्यात मनसेला ४0 हजार ९९0 मते मिळाली होती. निवडणुकीनंतर यातील थोडेच जण मनसेमध्ये कार्यरत राहिले. बाकीच्यांनी मनसे आणि राजकारण दोन्ही सोडून दिले.गतनिवडणुकीत जिल्ह्यात ४0 हजार मते पडलेली असतानाही या निवडणुकीत मनसेने सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा विचार केला नाही. यावेळी केवळ दापोली मतदार संघातच आपला उमेदवार उभा केला. कोकण विभागीय संघटक म्हणून काम करणाऱ्या खेडच्या वैभव खेडेकर यांनी या मतदार संघातून निवडणूक लढवली. गतवेळी ते खेड मतदार संघात उभे होते. यावेळी त्यांनी खेड मतदार संघ सोडून दापोलीमधून उमेदवारी दाखल केली. मात्र, तेथे त्यांना केवळ ८ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले. गतवेळी याच मतदार संघात मनसेला १२ हजाराहून अधिक मते मिळाली होती. यावेळी त्यात घट झाली आहे.लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभेला गुहागर मतदार संघात मनसे कार्यकर्त्यांनी ‘नोटा’चा वापर करण्याची भूमिका घेतली होती. पण नोटाचा वापर तेवढा दिसत नाही. मनसेची संघटनात्मक वाढ झालेली नाही, वैभव खेडेकर यांच्यानंतरच्या फळीत सक्षम नेतृत्त्व नाही. त्यामुळे मनसेची वाढ होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. समाजोपयोगी कामांमध्ये सहभाग नसल्यामुळे मनसे लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. स्थापनेनंतर पहिली एक-दोन वर्षे मनसेमध्ये हलचल दिसली होती. पण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ही हलचल पूर्णपणे थंडावली. त्यामुळेच २00९मध्ये पाच ठिकाणी लढून ४0 हजार मते मिळवणाऱ्या मनसेला या निवडणुकीत एकाच मतदार संघात लढून ८ हजार ९१२ मतांवर समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)