ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 17 - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) जयंत पाटील यांना त्यांच्या दालनात एका मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या मालकाने मद्यपान करून दमदाटी व शिवीगाळ केल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर शनिवारपासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयात दलालांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सकाळपासून कार्यालयात येणा:यांची विचारपूस करूनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील एका ड्रायव्हींग स्कूलचा मालक काही कागदपत्रे घेवून जयंत पाटील यांच्या दालनात घुसला़ यावेळी जयंत पाटील व मद्यपी यांच्यात शाब्दिक वाद झाला़ यावेळी त्याने पाटील यांना शिवीगाळ केली. कार्यालयातील कर्मचा:यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही तो जुमानत नव्हता. आरडाओरड करीत त्याने धिंगाणा घातला. हा मद्यपी पूर्वी दलाल होता. आता तो एका मोटार ड्रायव्हींग स्कूलचा मालक बनला आहे.या घटनेनंतर जयंत पाटील यांनी कार्यालय आवारातील दलालांना बाहेर काढले व प्रवेशद्वार बंद केले. दरम्यान, जयंत पाटील यांनी मात्र आपल्याला कुणीही शिवीगाळ व दमदाटी केली नसल्याचा दावा केला आहे. या घटनेचे वृत्त शहरात वा:यासारखे पसरले. सोशल मीडियावरही याबाबतची माहिती व्हायरल झाली.कार्यालयात घुसून आपल्याला शिवीगाळ व दमदाटी केल्याने जयंत पाटील संतापले होते. त्यांनी त्या मद्यपीला दालनातून बाहेर काढल़े त्यानंतरही त्याची आरडाओरड सुरूच होती. कार्यालयातील कर्मचा:यांनी हस्तक्षेप करीत त्या मद्यपीला कार्यालयातून बाहेर काढले. यापुढे अनधिकृत दलालांना कार्यालयात पाय ठेऊ देणार नाही, असा इशाराही आरटीओंनी दिला शुक्रवारीच दिला होता. त्यानुसार शनिवारपासून दलालांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
जळगावात आरटीओंना शिवीगाळनंतर दलालांना कार्यालयात प्रवेश बंद
By admin | Published: June 17, 2017 12:46 PM