शहरं
Join us  
Trending Stories
1
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
2
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
3
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
4
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
5
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
6
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
7
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
8
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
9
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
10
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
12
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
13
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
14
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
15
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
16
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
17
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
18
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
19
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
20
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos

नियुक्तीचा मार्ग मोकळा, १२ जणांत संधी कुणाला?; परिषदेसाठी इच्छुकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 7:27 AM

दोघांत तिसरा आल्याने पंचाईत, राज्यपालांकडे कोणती नावे जाणार याची उत्सुकता

मुंबई/नवी दिल्ली : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा भरण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोकळा झाला. मात्र, ही १२ जणांची नावे ठरवताना राज्यात सध्या सत्तेत असलेल्या तीन पक्षांच्या सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेत सहभाग झाल्यामुळे सरकारमध्ये दोघांत तिसरा आला आहे. त्यामुळे इच्छुकांची सर्वाधिक गर्दी असलेल्या भाजपला आधीपेक्षा कमी जागा मिळतील, अशी शक्यता आहे. 

राज्य विधान परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्त्यांवरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने मंगळवारी उठविली. मात्र, त्याचवेळी कोर्टाने याप्रकरणी नव्याने विशेष अनुमती याचिका दाखल करण्याचीही परवानगी दिली. ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठापुढे सुनावणी झाली. मूळ याचिकाकर्ते नाशिकचे काँग्रेसचे कार्यकर्ते रतन सोली लुथ यांना आपली याचिका मागे घेण्यास अनुमती दिली. दुसरे याचिकाकर्ते कोल्हापूर शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सुनील मोदी यांचे वकील निखिल नायर यांनी संबंधित सर्व मुद्दे मांडल्यावर कोर्टाने नव्याने विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची परवानगी दिली. ही याचिका दहा दिवसांत करावी लागेल, असे पत्रकारांशी बोलताना मोदी यांनी सांगितले.

मोठा फायदा सत्तापक्षाला विधान परिषदेत भाजपचे आधीच २२ सदस्य आहेत. शिवसेनेचे (अविभाजित) ११ सदस्य असले तरी नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, विप्लव बाजोरीया आधीच शिंदे गटासोबत आहेत. याशिवाय दोन-तीन सदस्य शिंदे गटात जातील, अशी चर्चा आहे. 

सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्नवाढलेल्या संख्याबळाचा फायदा घेत विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सभापती पद आपल्या पदरात पाडून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. तसेच ठाकरे गटाकडे असलेले विरोधी पक्षनेते पद (अंबादास दानवे) हिसकावून घेण्याच्या हालचालीदेखील घडू शकतात. विधान परिषदेवरील १२ सदस्यांचे वाटप करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी भाजपमधील ९०० जणांनी आपल्याला पत्र दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपच्या एका बैठकीत म्हटले होते. आता ही यादी एक हजारावर गेली आहे. अशावेळी केवळ ६ जणांना संधी द्यायची तर फडणवीस व भाजप यांची कसरत होणार आहे. महामंडळांचे अध्यक्ष अद्याप नेमलेले नाहीत. त्यामुळे आता सगळ्या इच्छुकांच्या नजरा विधान परिषदेकडे लागल्या आहेत. भाजपला आठ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चार जागा दिल्या जातील, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. मात्र, आता राष्ट्रवादीदेखील सरकारमध्ये असल्याने त्यांनाही वाटा द्यावा लागणार आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा