कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केलेल्या छाया सांगावकर, अजरुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांना पाठीशी घालणारे अध्यक्ष विजय कोंडके यांच्याविरोधात कार्यकारिणी सदस्यांनी सोमवारी अविश्वास ठराव मंजूर केला. तसेच उपाध्यक्ष आणि महामंडळाची बदनामी केल्याबद्दल तक्रार दाखल केलेल्या तिघांचेही सभासदत्व रद्द करण्याचा ठरावही या बैठकीत करण्यात आला.
महामंडळाच्या पुनर्लेखापरीक्षणाचा अहवाल देण्यावरून 3क् जुलैला झालेल्या भांडणानंतर छाया सांगावकर यांनी मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. यावर निर्णय घेण्यासाठी महामंडळाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अष्टेकर, माजी अध्यक्ष प्रसाद सुव्रे, कार्यवाह सुभाष भुरके, सदस्य सदानंद सूर्यवंशी, सतीश बीडकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
बैठकीत या तिघांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी 9 विरुद्ध 1 असा ठराव करण्यात आला. सदस्यत्व रद्द करू नये, असे एकमेव मत अध्यक्षांचे होते. या तीन व्यक्तींमुळे महामंडळाच्या परंपरेला आणि सन्मानाला धक्का लागलेला असताना अध्यक्ष त्यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून कार्यकारिणीतील संचालकांनी अध्यक्षांना धारेवर धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सायंकाळर्पयत चाललेल्या या बैठकीच्या अखेर्पयत अध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने अखेर कार्यकारिणीने त्यांच्याविरोधात 8 विरुद्ध 2 असा अविश्वास ठराव मंजूर करून त्यांना कार्यमुक्त केले. (प्रतिनिधी)
बहिणीविरोधात निवेदन
सांगावकर यांची बहीण सुरेखा शहा यांनी सांगावकर आणि अन्य दोन सदस्यांच्या या वागणुकीविरोधात अध्यक्षांना निवेदन दिले आहे. या लोकांचे महामंडळात काय योगदान आहे? त्यांची लायकी काय आहे? याचा विचार करावा. महामंडळाच्या सभेत धुडगूस घातलेल्या या फालतू लोकांना आम्ही निवडून दिलेल्या सदस्यांची बेअब्रू करण्याचा काडीचाही अधिकार नाही. पदाधिका:यांचे फोटो डिजिटलवर झळकवून अकलेचे तारे तोडणा:यांचा मुलाहिजा न बाळगता महामंडळाने कठोर भूमिका घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
नूतन अध्यक्षांची निवड 25 रोजी : महामंडळाचे अध्यक्षपद विजय कोंडके आणि विजय पाटकर यांना एक-एक वर्षासाठी विभागून देण्यात आले होते. त्यानुसार कोंडके यांची अध्यक्षपदाची मुदत 27 ऑगस्टला संपणार होती. परंतु, त्याआधीच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. 25 ऑगस्टला होणा:या महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठकीत नूतन अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती कार्यवाह सुभाष भुरके यांनी दिली.
विजय कोंडकेंना घेराव : बैठकीची वेळ दुपारी 12 वाजताची होती; मात्र 11 वाजल्यापासूनच सभासदांनी महामंडळाच्या दारात रिमोटवर चालणारा अध्यक्ष, अकार्यक्षम अध्यक्ष अशा आशयाचे फलक हातात धरून कोंडके यांचा निषेध केला. सव्वाबाराच्या दरम्यान, कोंडके महामंडळाच्या दारात आले, मात्र जोर्पयत तुम्ही सांगावकर, नलवडे आणि पन्हाळकर यांचे सभासदत्व रद्द करण्याचा शब्द देत नाही तोर्पयत तुम्हाला बैठकीस जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत सदस्यांनी त्यांना पाऊणतास घेराव घातला.