ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 16 - मतदानाचे महत्व जाणून बुलडाणा जिल्ह्यातील दोन ठिकाणी नवरदेव व नवरीने लग्नाअगोदर मतदानाचा अधिकार बजावत नवा आदर्श समोर ठेवला. या नवरदेव आणि नवरीने सुरूवातील मतदान केले व त्यानंतर बोहल्यावर चढले. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. परंतू सद्यपस्थितीत अनेकजण मतदानासाठी मिळणाºया सुट्टीचाही दुरुपयोग करतात. मतदानाला मिळालेल्या सुट्टीला मतदान न करता बाहेरगावी फिरण्यात या सुट्टीचा आनंद घेताता. परिणामी मतदानाचा टक्का दिवसेंदिवस घटत चालला आहे. परंतू बुलडाणा जिल्ह्यातील नवरदेव नवरीने सुरूवातीला मतदानाचा हक्क बजावून त्यानंतर शुभमंगल केल्याचा प्रकार जि.प.व पं.स निवडणूकीच्या मतदान केंद्रावर समोर आला आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे-लिहा सर्कलमधील ऊऱ्हा येथील सचिनसिंग राजपूर या युवकाने १६ फेब्रुवारीरोजी सकाळी सुरूवातीला मतदान
केले व त्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढला. लग्नापेक्षाही मतदानाच्या अधिकाराला अधिक महत्व देणाऱ्या उऱ्हा येथील या युवकाचे आदर्श मतदान ठरले. त्यानंतर असाच प्रकार लोणार तालुक्यातील नांद्रा येथे घडला. आश्रुबा माणिकराव मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां. अनिता या नववधुने लग्णाच्या दिवशी सुरूवातीला मतदानाचा हक्क बजावला व त्यानंतर लग्न मंडपात गेली. बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी घडलेल्या या आदर्श मतदानाने मतदानाचे महत्व पटवून दिले आहे. दोन्ही ठिकाणच्या या नवरदेव नवरीने लग्नापेक्षा मतदानाला महत्त्व दिल्याने त्यांच्या मतदानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
अनिताने लग्नाच्या दिवशी मतदानाला दिले महत्त्व
लोणार तालुक्यातील नांद्रा येथील आश्रुबा माणिकराव मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां. अनिता या नववधुने वराला वरमाला घालण्याअगोदर मतदानाचा अधिकार बजावला व मतदानाचे महत्व पटवून दिले. येथील आश्रुबा मुंढे यांची सुकन्या चि.सौ.कां.अनिता हिचा विवाह वाकद ता. रिसोड येथील कैलास निवृत्ती डोंगरे यांच्याशी १६ फेब्रुवारी रोजी लोणी सखाराम महाराज येथे पार पडला. यावेळी वधूने सकाळी मतदान केंद्रावर जाऊन प्रथम आपला मतदानाचा हक्क बजावला. उच्चशिक्षीत असलेल्या अनिताने लग्नाच्या घाईगर्दीत मतदान करण्याचा निर्णय सर्वांना नवल वाटणारा ठरला. तसेच लग्न सोहळा सुद्धा सर्व वायफळ खर्चांना फाटा देऊन अगदी साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय केला व अंमलात आणला. यामुळे या आदर्श वधुचा हा लग्नसोहळा एक आदर्शच ठरला. (वार्ताहर )