शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महायुतीत बेबनाव? भाजपाच्या मित्रपक्षानेच जाळला राज्य सरकारमधील मंत्र्यांचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 2:11 PM

Maharashtra Politics: नेमके प्रकरण काय?

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. यानंतर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे महायुतीचे सरकार कारभार पाहू लागले. आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यात आंदोलने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षणावरून समाज आक्रमक झाल्याचे दिसत असून, दुसरीकडे विविध मुद्द्यांवरून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यातच महायुतीत बेबनाव आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण भाजपच्या एका मित्रपक्षाने राज्य सरकारमधील एका मंत्र्याचा पुतळा जाळल्याची घटना घडली आहे. सरकोली ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे रयत क्रांती संघंटनेच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. ऊस बंदीच्या निर्णयाविरोधात रयत क्रांती संघटनेने राज्यभर सहकार मंत्र्यांचा पुतळा जाळो आंदोलन केले. रयत क्रांती संघटनेने केले सहकार मंत्र्यांचा पुतळा जाळो आंदोलन

राज्य सरकारने या वर्षीच्या हंगामात ऊसावर झोनबंदी लावली आहे. १९९६ साली राज्य सरकारने झोनबंदी लावली होती. स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली आणि त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी झोनबंदी उठवून ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पायातील बेड्या काढल्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या  नेतृत्वाखालील राजकारण करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झोनबंदी लावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

दरम्यान, एका बाजूला ऊसाचे उत्पादन घटले आहे. ऊत्पादन खर्च वाढला असताना ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे  ,मजुरी वाढली, खताच्या किमती चौपट झाल्या आहेत. नागंरटीचा खर्च वाढला आहे त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नाही. आता सरकारने ऊसाचा FRP प्रती टन पाच हजार भाव जाहीर करावा. नाहीतर झोनबंदी उठवावी जर झोनबंदी नाही उठवली तर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील वाजत गाजत बाहेरच्या राज्यात ऊस घेऊन जावू, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सरकारला आवाहन केले आहे.

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारFarmerशेतकरीDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील