शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शुल्कवाढ प्रकरणी विनोद तावडे यांना पुन्हा घेराव

By admin | Published: May 12, 2017 5:38 PM

बेकायदेशीरपणे शुल्कवाढ करणाऱ्या शाळांवर काहीच कारवाई होत नसल्याने शुक्रवारी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुन्हा घेराव घेतला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 12 : बेकायदेशीरपणे शुल्कवाढ करणाऱ्या शाळांवर काहीच कारवाई होत नसल्याने शुक्रवारी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुन्हा घेराव घेतला. यापार्श्वभुमीवर पुण्यातील भरमसाठ शुल्कवाढ करणाऱ्या १८ शाळांचे व्यवस्थापन व पालक यांना सोमवारी सुनावणी मुंबईत बोलाविण्यात आले असून यावेळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे विनोद तावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विनोद तावडे पुण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर पालकांनी शुल्कवाढ प्रकरणी काहीच कारवाई झाली नसल्याचे तावडे यांच्या निर्दशनास आणून देऊन त्यांना घेराव घातला. त्यानंतर तावडे यांनी सर्व पालकांशी चर्चा तासभर चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले.विनोद तावडे यांनी सांगितले, ह्यह्यशुल्कवाढी संदर्भात पुण्यातील १८ शाळांच्या तक्रारी आलेलया आहेत. त्यांना सुनावणीसाठी मुंबईला बोलाविण्यात आले आहे. या सुनावणीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. शाळांमधूनच पुस्तके व इतर शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाऊ नये याबाबतच्या सुचना पालकांना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शाळांविरोधात ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.ह्णह्णपीएचडीचे संशोधन योग्य होत नसल्याची केवळ टिकाच करून थांबणार नसून या संशोधनासाठी विद्यापीठांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खाजगी कंपन्यांच्या उत्कृष्ट लॅबची मदत पीएचडी संशोधनासाठी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले