अजित पवारांनीशरद पवारांवर आरोप करताना आता वय झालेय, आशिर्वाद द्यायला हवा होता असे म्हणत निवृत्त व्हाय़ला हवे होते असे म्हटले होते. परंतू, त्याचवेळी अजित पवारांसोबत गेलेले मंत्री छगन भुजबळ यांचेही वय झाल्याची चर्चा सुरु झाली होती. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांनी पंचाहत्तरी ओलांडली आहे. यामुळे जो नियम अजित पवार शरद पवारांना लावत आहेत, तो त्यांच्या मंत्र्यालाही लागू होतो, अशी टीका होत होती. यावर अजित पवारांनी वयामुळे मला थांबायला सांगितलं, तर मी थांबेन, असे भुजबळ म्हणाले.
भाजपा-शिवसेनेसोबत युतीत जाण्याचा निर्णय कायदेशीर बाबींवर चर्चा करुनच अजित पवारांनी चर्चा करून घेतला आहे. वकीलांचा सल्ला घऊनच आम्ही ही पावलं उचलेली आहेत. अजित पवार पक्षाचे प्रमुख राहतील. पक्षात सगळ्यांचं आमच्यावर प्रेम असतं तर अश्या घटना घडल्या नसत्या. कायदेतज्ञांच्या सल्ल्यामुळे आम्हाला अपात्रतेची भीती नाही. आम्ही शेवटपर्यंत मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो. काही मार्ग निघत नाही हे दिसल्यावर आम्ही या निर्णयावर आलो, असे भुजबळ म्हणाले.