मुंबई : ‘केंद्र सरकारच्या धर्तीवर ज्येष्ठ नागिरकांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षांवर आणण्यात येईल, तसेच वृद्धाश्रमांना सध्या देण्यात येणाऱ्या ९०० रुपयांच्या अनुदानात १५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानपरिषदेत केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात येईल,’ असेही ते म्हणाले. राज्यात १ कोटी २० लाख ज्येष्ठ नागरिक असूनही सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशानात सरकारने ज्येष्ठांची वयोमर्यादा ६५ वरून ६० वर आणण्याचे म्हटले होते. त्याची अंमलबजावणी कधी करणार, असा प्रश्न संजय दत्त यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बडोले म्हणाले की, ‘ज्येष्ठांची वयोमर्यादा ६५ वरून ६० करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने उच्चािधकार समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. आता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात वरिष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे मानण्यात येईल.’वृद्धाश्रमांच्या अनुदानातही वाढस्वयंसेवी संस्थांकडून राज्यात ३९ वृद्धाश्रम व ३१ मातोश्री वृद्धाश्रम चालविण्यात येतात, परंतु त्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ९०० रुपये इतके तुटपुंजे अनुदान दले जाते. या रकमेत वाढ करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर अशा वृद्धाश्रमांना सध्या देण्यात येणाऱ्या ९०० रुपयांच्या अनुदानात १५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल, असे बडोले म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० होणार
By admin | Published: April 01, 2016 1:40 AM