शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

शेतक-यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच

By admin | Published: June 04, 2017 9:48 AM

संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत रविवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4- संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत रविवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले. एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप कायम ठेवण्याची भूमिका जाहीर झाल्याने संपात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. पुणतांब्यात शनिवारी ग्रामसभा झाली, त्यात संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही आंदोलनाची धग कायम आहे.  खान्देशातही संपाची धग कायम असली तरी बाजार समित्यांमध्ये अल्प प्रमाणात व्यवहार सुरू आहेत.
 
आज सकाळी अहमदनगरमध्ये नगर-कल्याण मार्गावर माळशेजजवळ शेतमाल घेऊन जाणारे वाहन पेटवण्यात आले आहे तर कालच्या विश्रांतीनंतर  वर्ध्यात सालोड टी पॉइंटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानंकडून पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे, रस्त्यावर लाकडं जाळून भाजीपाला आणि दूध फेकून घोषणा देण्यात येत आहेत.  सोलापूरमध्ये मोहोळ येथे आठवडा बाजार बंद करण्यात आला आहे जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैय्या देशमुख यांनी येथील बाजार बंद केला आहे.   नाशिकमध्ये शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर म्हसरुळ चौफुलीवर भोपळे फेकून शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. कर्जमाफी व हमीभाव मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात येत आहे.    येवला तालुक्यातील पाटोदा येथेही शेतकरी संप चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतत शासनाचा निषेध करीत आंदोलन तीव्र केले आहे . 
                 
 शनिवारी राज्यातील पाच एकरपर्यंत शेतजमीन असलेले अल्पभूधारक आणि कर्ज थकीत असलेल्या २७ लाख शेतकऱ्यांचे ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा आंदोलकांच्या कोअर कमिटीने केली होती. ही कर्जमाफी येत्या ३१ आॅक्टोबरपूर्वी अमलात येईल, हा माझा शेतकऱ्यांना शब्द आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ अशी भूमिका आपण आधीपासूनच घेतली होती. सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. मात्र, नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा देणारे काही निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप कायम ठेवण्याची भूमिका जाहीर झाल्याने संपात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. 
 
शेतकरी युद्धात जिंकला; तहात हरला - पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गंडवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे. शेतकरी संपामागे काँग्रेस व राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप करणे म्हणजे पोरकटपणा आहे. शेतकरी युद्धात जिंकला पण तहात हरला, असे पवार म्हणाले. कर्जमाफी केवळ अल्पभूधारकांनाच का? सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती, असे ते म्हणाले.