ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 3 - अखिल भारतीय आगरी महोत्सव कार्यक्रम गेली 14 वर्षे इथं सुरु आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळावा यासाठी आम्ही मागणी करत होतो. तीन वर्षे सतत पाठपुरावा केल्यानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला. या संमेलनामुळे येथील आगरी समाजाला चांगला मान मिळला आहे, असे उद्गार 90व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी काढले.
"मराठी शाळा, ,संस्कृती टिकावी, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत.गझल कट्टा येथे दिला आहे, अशी माहितीही स्वागताध्यक्षांनी दिली. या संमेलनात राज्यातील विविध बोली भाषांचे कवी संमेलन होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. "संमेलनातून होणारी पुस्तक विक्री महत्त्वाची असते, यावेळेही पुस्तकांचे 365 लागले आहेत. संमेलनाला भेट देणाऱ्या शाळा, काँलेजमधील किमान एक लाख विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी करावीत," असे आवाहनही वझे यांनी केले.
यावेळी साहित्याच्या व्यासपीठावरून कल्याण-डोंबिवलीकरांच्या समस्याही गुलाबराव वझे यांनी मांडल्या. "आज तीन नागपूरकर येथे उपस्थित आहेत. ते डोंबिवलीकरांना काही ना काही देणारच अशी अपेक्षा आहे. 27 गावांचा प्रश्ना मार्गी लागावा. संस्थेला जागा मिळावी आणि डोंबिवलीकरांना होणारा रेल्वेचा त्रास वाचावा, अशी विनंती वझे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.