शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

कृषी केंद्रांनी बियाणे उचललेच नाही!

By admin | Published: May 17, 2017 2:53 AM

महाबीज, कंपन्यांनी केले बियाण्यांचे नियोजन : शेतकऱ्यांची खरेदी शून्य!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) ६ लाख ५३ हजार क्ंिवटल विविध बियाण्यांचे नियोजन केले असून, खासगी बियाणे कंपन्यांनीही बियाण्यांची तजवीज केली आहे; परंतु कृषी विक्रेता व्यावसायिक संघाने अद्याप बियाण्यांची उचल केली नाही. रासायनिक खतांच्या साठ्याचीही तीच स्थिती आहे. खरीप हंगाम तोंडावर आला असताना यावर्षी बियाणे बाजारात शुकशुकाट आहे.राज्यात १ कोटी ४० लाख हेक्टरवर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यादृष्टीने महाबीजने बियाण्यांचे नियोजन केले असून, खासगी कंपन्यांनीही बियाणे तयार केले आहे. महाबीजने गतवर्षी ५ लाख १२ हजार क्ंिवटल बियाण्यांचे नियोजन केले होते. यावर्षी ६ लाख ५३ हजार क्ंिवटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची गरज व मागणी बघता महाबीजने पाच लाख तीन हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले आहे. गतवर्षी हे बियाणे ४ लाख ५ हजार क्ंिवटल एवढेच होते. तुरीचे बियाणे गतवर्षी १३ हजार क्ंिवटल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. यावर्षी १८ हजार क्ंिवटल तूर बियाणे उपलब्ध केले आहे. उडीद १३,५०० क्ंिवटलवरू न १६ हजार ५३० क्ंिवटल, मूग बियाणे गतवर्षी २,२०० क्ंिवटल होते. ते यावर्षी पाच हजार क्ंिवटल आहे. धान गतवर्षी ६६ हजार क्ंिवटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी ८५ हजार क्ंिवटल नियोजन आहे. ज्वारीचे ६ हजार ५०० क्ंिवटलचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहेत. दरम्यान, यावर्षी बियाण्यांच्या मुबलकतेसह विविध रासायनिक खतांचा साठा मुबलक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांसाठी यावर्षी अतिरिक्त खतसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सव्वालाख मेट्रिक टन जास्त म्हणजेच ५ लाख ७९ हजार मेट्रिक टन खताचा हा साठा आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ११ हजार मेट्रिक टन खते प्रत्यक्षात उपलब्ध झाले आहेत.कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पूरक बियाणे उचलले नसून, शेतकऱ्यांकडून अद्याप बियाण्यांची मागणी नाही. पाऊस आल्यावरच बियाण्यांची खरेदीला वेग येईल.- प्रभाकर गावंडे, अध्यक्ष, जिल्हा कृषी विक्रेता संघ, अकोला.यावर्षी पावसाळा वेळेवर असल्याने शेतकरी मशागतीच्या कामाला लागलेला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर बियाणे खरेदीला सुरुवात होईल. शेवटच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्र सुरू होणार आहे.- एस.आर. सरदार, विभागीय संयुक्त संचालक, कृषी विभाग, अमरावती.