संग्रामपूर (जि. बुलडाणा), दि. 0९ : गिरीश अँग्रो सेंटर या कृषी केंद्र चालकाने शेतकर्याला मुदतबाह्य किटकनाशक विक्री केल्याने सिद्ध झाल्यानंतर जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी दुकानाचा किटकनाशक विक्रीचा परवाना ८ ऑगस्ट रोजी रद्द केला आहे.निरोड येथील शेतकरी गजानन संगीतराव अवचार यांनी कपाशी पिकावर तुडतुडे व मावा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणीकरिता गिरीश अँग्रो सेंटरमधून ९ जुलै रोजी रॅलिज टाटा मिडा या नामांकित कंपनीचे १00 मिलीचे किटकनाशक खरेदी केले होते. लॉट नंबर एसए ४00१५ असलेल्या या किटकनाशकावर उत्पादनाची तारीख २ जून २0१४ असून १ जून २0१६ ही तारीख किटकनाशकाची मुदत संपणार असल्याबाबत उत्पादनावर दर्शविण्यात आली होती. अवचार यांनी किटकनाशक खरेदी केले तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी २ ऑगस्ट रोजी गिरीश अँग्रो या कृषी केंद्रचालकाविरुध्द पंचायत समिती कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. कृषी अधिकारी उंद्रे यांनी या प्रकरणाची ३ ऑगस्ट रोजी चौकशी केली असता या चौकशीमध्ये कृषी केंद्रचालक सतीष राठी याने संबंधित शेतकर्यास मुदतबाह्य किटकनाशक विक्री केल्याचे सिध्द झाले होते.या चौकशीचा अहवाल जिल्हा कृषी विकास अधिकारी भराड यांना पाठविण्यात आला होता. या चौकशी अहवालावरुन जिल्हा कृषी विकास अधिकारी भराड यांनी गिरीश अँग्रो सेंटरचा किटकनाशक विक्रीचा परवाना ८ ऑगस्ट रोजी रद्द केला आहे. शेतकर्यांची अशाप्रकारे फसवणूक होवू नये यासाठी सदर प्रकरणाबाबत ह्यलोकमतह्णने वृत्ताच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता.
--सतिष राठी व पंचायत कृषी अधिकारी यांच्या सक्षम घेण्यात आलेल्या समक्ष सुनावणीत गिरीश अँग्रो सेंटरचा किटकनाशक विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.- रमेश भराडजिल्हा कृषी विकास अधिकारी बुलडाणा