ऑनलाइन लोकमत
अहेरी (गडचिरोली), दि. २६ - विविध पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी केरळ राज्यातर्फे घेण्यात येणाऱ्या केरळ सुपरस्पेशालटी प्रवेश परिक्षेमधे अहेरीचा युवक डॉ. सुशील भोगावार याने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
देशभरातून ५०० पेक्षा जास्ती सर्जन (Master Of Surgeon) डॉक्टरांनी ही परीक्षा दिली होती यात सुशिल ने हे यश मिळविले असून तिन वर्षीय एमसीएच न्यूरोसर्जरी डिग्री साठी तो पात्र झाला आहे. या डिग्री नंतर तो मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ञ होणार आहे. डॉ सुशिल सध्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपुर येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. तसेच डॉ सुशिलचे प्राथमिक शिक्षण अहेरीत झाले आहे.
डॉ सुशिल ने आपल्या यशाचे श्रेय आपले वडील दत्तात्रय भोगावार,आई,भाऊ तसेच गुरुवार्यान्ना दिले आहे. गडचिरोली व चंद्रपुर परिसरात मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ञ फार कमी असल्याने या परिसरात मला पुढे ही सेवा द्यायची आहे अशी माहिती डॉ.सुशिल ने लोकमत शी बोलतांना दिली.