शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

अहमदनगर - मुलींवरील अत्याचाराचे सत्र सुरुच

By admin | Published: October 21, 2016 7:47 PM

कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जतच्या आक्काबाईनगरमधील अल्पवयीन शाळकरी मुलीवर गुरुवारी लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना घडली.

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. २१: कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जतच्या आक्काबाईनगरमधील अल्पवयीन शाळकरी मुलीवर गुरुवारी लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना घडली. घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जत बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला. तसेच रास्ता रोको करण्यात आला. कर्जत येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कर्जत मध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आठ वर्षे वयाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी ग्रामस्थांनी अत्याचार करणाऱ्या शिवा मल्हारी रंधवे या युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरूद्ध गुरुवारी रात्री उशिरा कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रात्री कर्जत पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी होती. अत्याचार करणाऱ्या आरोपीस कर्जत पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली. कोपर्डीची घटना ताजी असतानाच कर्जत येथे पुन्हा एका मुलीवर अत्याचार झाल्याने कर्जतमध्ये मोठा संताप निर्माण झाला. घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्जतमध्ये कडकडीत बंद पाळला. भाडेवाडी येथूनन मोर्चा काढून कर्जत - मिरजगाव मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. आरोपीला सहा महिन्यात कडक शिक्षा करावी, कर्जत शहर व उपनगरातील रोडरोमिओंचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा, आक्काबाईनगर येथील आरोपीच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, बसस्थानक परिसरात तसेच आक्काबाईनगर विद्यालयाच्या परिसरातील रोडरोमिओंचा वाढता त्रास रोखण्यासाठी पोलीस व प्रशासनाने पावले उचलावीत अशा मागण्या यावेळी मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना मांडल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन मुंडे व तहसीलदार किरण सावंत यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनात सकल मराठा समाज तसेच सावता माळी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपनगराध्यक्ष सोमनाथ कुलथे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, शिवसेनेचे शहरप्रमुख गणेश क्षीरसागर,राहुल नवले, अक्षय राऊत, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, नितीन तोरडमल,संतोष धुमाळ, अनिल गदादे, सचिन सोनमाळी, अजित अनारसे,संतोष म्हेत्रे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.